शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी वर्षा बंगल्याबाबत माध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांसाठी अधिकृत निवासस्थानला वर्षा बांगला म्ह्णून नाव देण्यात आलं आहे. या वर्षा बंगल्याबाबत संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले वर्षा बंगल्यात कोणीतरी जादूटोण्याचा प्रकार केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बंगल्यात राहायला जाण्यास तयार नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे. मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो तरी रात्री तिकडे झोपणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे.त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेऊन अनेक दिवस उलटल्यानंतर देखील देवेंद्र फडणवीस सागर बंगला सोडून वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
या गोष्टींचा सर्वात जास्त अनुभव त्यांना आहे. याच्यातील जास्त अनुभव त्यांना असल्यामुळे तुम्ही त्यांनाच त्याबद्दल विचारा खरं काय आहे आणि खोटं काय आहे ते, त्यांच्यावर बोलण्याची आवश्कता मला वाटतं नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
आज माध्यमांशी बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, भाजपच्या वर्तुळात अशी चर्चा आहे की, वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंग आणून पुरली आहेत. आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. मात्र, वर्षा बंगल्यावरील कर्मचारी वर्गात अशी कुजबुज रंगली आहे. कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्यांची ही शिंग मंतरलेली आहेत. जो कोणी दुसरा मुख्यमंत्री येईल, त्याचं मुख्यमंत्रीपद टिकू नये, यासाठी ही मंतरलेली रेड्याची शिंगं वर्षा बंगल्यावर पुरुन ठेवण्यात आली आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला तयार नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत, पण ते अधिकृत निवासस्थानी जायला तयार नाहीत. देवेंद्र फडणवीस अस्वस्थ का आहेत, हे महाराष्ट्राला समजले पाहिजे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा :
CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?
Konkan Hearted Girl अंकिता प्रभू वालावलकरने नवऱ्यासह Raj Thackeray ना दिले लग्नाचे खास आमंत्रण
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा