spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Eknath Shinde यांच्या ‘डेडलॉक’ शब्दाची राजकीय वर्तुळात चर्चा

महाराष्ट्रातील महायुती सरकार स्थापनेसाठी दिल्लीमध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानंतर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात काल बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झाले आहे. आता मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. मात्र, प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपली कोणतीही नाराजी नसल्याचे सांगत आता डेडलॉक संपल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी उच्चरलेल्या डेडलॉक या शब्दाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या नियुक्तीसाठी लवकरच भाजपचे केंद्रीय निरीक्षक मुंबईत येऊन मुख्यमंत्रीपदी कोण असेल याचं नाव निश्चित करून औपचारिक घोषणा करतील. एकनाथ शिंदे यांनीही आपल्याला भाजप नेतृत्वाचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. आमची भूमिका मी काल जाहीर केली. महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मी कालच दिलेला आहे. त्यामुळे तो डेडलॉक संपला आहे. आता भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि त्यानंतर निर्णय होईल. सगळं व्यवस्थित होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले, त्यामुळे आता उपमुख्यमंत्रीपद हे स्वतःकडे घेण्याशिवाय भाजपाकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. एक पक्ष म्हणून स्वतःचा विस्तार करणं हे भाजपसाठी महत्त्वाचे ध्येय आहे. इतकं मोठं यश मिळाल्यांनतर कार्यकर्त्यांना शांत कसं बसवणार, पुन्हा त्यागाची भाषा करणे कठीण होते. त्यामुळे राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणे महत्वाचे होते. त्यानुसार आता भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचे ठरवले आहे. रीतसर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली जाईल.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदे हताश? देवेंद्र फडणवीस – अजित पवारांनी शेअर केले अमित शाहांसोबतचा फोटो, पण शिंदे मात्र…

अमित शाहांसोबत रात्री पार पडली बैठक, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss