spot_img
Saturday, February 8, 2025

Latest Posts

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तीन-चार महिन्यात : मुख्यमंत्री फडणवीस

“स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तीन-चार महिन्यात येतील. सुप्रीम कोर्टाचा निकाल येणं बाकी आहे. विधानसभेत विजय मिळवला तर येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा विजय मिळवायचा आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिली आहे.

“स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तीन-चार महिन्यात येतील. सुप्रीम कोर्टाचा निकाल येणं बाकी आहे. विधानसभेत विजय मिळवला तर येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा विजय मिळवायचा आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिली आहे. भाजपच्या शिर्डीत झालेल्या राज्यस्तरीय शिबारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी म्हटले की. “महाराष्ट्रात व्होट जिहाद पार्ट २ सुरू झाला आहे”, “ज्यांच्यामुळे हा भगवा फेटा घालू शकलो, ज्यांच्यामुळे उद्याची पहाट ही कशी असेल हे कुणालाही माहिती नव्हती, तेव्हा शिवरायांना देव देश आणि धर्म लिहिण्याची प्रेरणा दिली, त्या जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होतो”, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

“महाराष्ट्रात जो महाविजय प्राप्त झाला, त्यासाठी मी साष्टांग दंडवत घालतो. आपल्यामुळे हा विजय मिळाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आभार मानतो. ते या लढाईत २४ तास सोबत उभे होते. लोकसभा निवडणुकीनंतर पार्टी हताश होती. कार्यकर्त्यांना कळत नव्हते की काय चुकले ज्यामुळे असा पराभव झाला. त्यानंतर अमित शाह यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. हजारो कार्यकर्त्यांना भेटत मार्गदर्शन केले, त्यांच्या मनात विजयाची खात्री दिली. संपूर्ण पक्ष उभा राहिला आणि हा महाविजय खेचून आणला. त्यासाठी अमित शाह यांचे खूप खूप आभार मानतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “भाजपात श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र पाळला जातो. ज्यांना हा मंत्र समजला ते यशस्वी झाले, ज्यांना नाही समजलं त्यांची निवडणुकीत हालत बुरी झाली. मकरसंक्रमण संपून महाकुंभाचे अमृत घेण्यासाठी हजारो लोक एकत्र येत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला शंभरहून अधिक जागा दिल्या. गेल्या ३० वर्षात ही कामगिरी करणारा भाजप एकमेव पक्ष आहे. लोकसभेत आपल्या १७ जागा निवडून आल्या. पण त्यानंतर आपण प्रयत्न केले. २८८ पैकी २३७ जागा जिंकून आपण इतिहास निर्माण केला आणि मेरिटमध्ये पास झालो. भाजपने आजवरच्या सत्ताधारी पक्षाच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“लोकांची सेवा करणे ही राज्यकर्ता म्हणून आमची आणि कार्यकर्ता म्हणून तुमची जबाबदारी आहे. आपण सुखासीन झालो तर हा लोकांनी दिलेल्या जनमताचा अवमान ठरेल. लोकसभेच्या काळात अराजकतावादी शक्तींचा प्रभाव महाराष्ट्रात होता. काँग्रेस, शरद पवारांचा पक्ष आणि उबाठाने राज्यात व्होट जिहाद केला. निवडणुकीत पराभव केला तरी ते शांत बसले नाहीत. बांग्लादेशी खोट्या कागदपत्रांच्या आधारे मतदार याद्यांमध्ये घुसत आहेत. महाराष्ट्रात व्होट जिहाद पार्ट २ सुरू झालाय”, असा धक्कादायक दावा देंवेंद्र फडणवीस यांनी केला. “एक हैं तो सेफ हैं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी सांगितलं आणि ते निवडणुकीत खरं ठरलं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “समाजात दुफळी माजवण्याचा प्रयत्न हाणून पडायचा आहे. सरकारप्रमाणे पक्षालाही शंभर दिवसांचा कार्यक्रम द्या. त्यातील पहिले उद्दिष्ट दीड कोटी सदस्य संख्या बनवणे असावे”, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. “आपण सुरु केलेल्या योजना आपण बंद करणार नाही. मंत्रालयात येताना काम घेऊन या. फक्त स्टेटस म्हणून येऊ नका. सरकारचे कार्यक्रम खालपर्यंत कसे जातील यासाठी काम करावे लागेल. या योजना सर्वसामान्यांच्या जीवनातील दुःख दूर करण्याचे साधन आहे”, असं म्हणत निधीचा गैरवापर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी कानउघाडणी केली.

– किशोर आपटे

Latest Posts

Don't Miss