Thursday, November 30, 2023

Latest Posts

तेलंगणातील BRS ची महाराष्ट्रात एन्ट्री

तेलंगणाच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

तेलंगणाच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यातील तब्बल 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा (Maharashtra Gram Panchayat Election Result) निकाल समोर येत आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासह आता बीआरएस पक्षालाही ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांच्या बीआरएस पक्षाला महाराष्ट्रातील दहा ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळला आहे. भंडाऱ्यातील नऊ ग्रामपंचायतीवर बीआरएस पक्षाने झेंडा रोवला आहे. तर बीडमधील रेवती देवकी ग्रामपंचायतही ताब्यात आली आहे.

भंडाऱ्यातील नऊ ग्रामपंचायतीवर बीआरएसचा झेंडा –

भंडारा जिल्ह्यातील ६६ पैकी २० ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे. भंडाऱ्यात आतापर्यंत बीआरएस पक्षाने बाजी मारली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला पक्षाडत बीआरएस पक्षानं आतापर्यंत भंडाऱ्यातील 9 ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाला आतापर्यंत दोन दोन ग्रामपंचयतीमध्ये विजय मिळवता आलाय. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एका ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळलाय.

भंडाऱ्यातील निकाल काय ?
काटेबाम्हणी ग्रामपंचायतवर BRS पक्षाचा विजय….सरपंचपदी नितेश बांडेबुचे विजयी
उसरा ग्रामपंचायतवर भाजप पक्षाचा विजय….सरपंचपदी मायावती रामटेके विजयी
सालई बु ग्रामपंचायतवर काँग्रेस पक्षाचा विजय….सरपंचपदी कविता बांडेबुचे विजयी
धुसाळा ग्रामपंचायतवर BRS पक्षाचा विजय….सरपंचपदी धोंडू खंडाते विजयी

भंडारा ग्रामपंचायत निकाल

एकूण ग्रामपंचायती- 66/20
भाजप – = 1+1
शिंदे गट – = 0
ठाकरे गट – = 0
अजित पवार गट – 1+1+1+1+1+1
शरद पवार गट – 1
काँग्रेस -1+1
BRS – 1+1+1+1+1+1+1+1+1
इतर – 1

बीडमध्ये एक ग्रामपंचायत बीआरएसकडे –

बीडमध्येही बीआरएस पक्षाने विजय मिळवला आहे. गेवराई तालुक्यातील रेवकी ग्रामपंचायतीवर बीआरएसने झंडा फडकावला आहे. शशिकला भगवान मस्के या सरपंचपदी विराजमान झाल्यात.

के चंद्रशेखर राव यांची महाराष्ट्राला पसंती –
के चंद्रशेखर राव यांनी आपल्या बीआरएस पक्षाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रातून सुरुवात केली. आषाढी एकादशीला तेलंगणामधून तब्बल ३०० गाड्यांचा ताफा घेऊन के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात ग्रँड एंट्री केली. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात राज्यातील अनेक नेत्यांनी प्रवेश केला होता. चंद्रशेखर राव यांनी मागील काही दिवसात महाराष्ट्रात अनेक सभा घेत शेतकऱ्यांना अश्वासने दिली आहेत. त्याशिवाय सत्ताधारी भाजपवर त्यांनी टीकाही केली. केसीआर यांनी मराठवाड्यातील नांदेड येथून महाराष्ट्रात प्रचाराला सुरूवात केली होती, नांदेड येथे घेतलेल्या सभेत त्यांनी अबकी बार किसान की सरकार असी घोषणा दिली होती.

हे ही वाचा : 

Ahmednagar – परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार

ढिचॅक दिवाळीच्या रेडकार्पेटवर मराठी कलकारांच्या नवनवीन लूकची आतषबाजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss