Friday, December 1, 2023

Latest Posts

Manoj Jarange Patil यांच्या उपोषणापूर्वीच गिरीश महाजन यांनी केला फोन, म्हणाले…

Manoj Jarange Patil यांच्या उपोषणापूर्वीच गिरीश महाजन यांनी केला फोन, म्हणाले...

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं आजपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू झालं आहे. त्यांच्या उपोषणापूर्वीच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Rural Development Minister Girish Mahajan) यांनी त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांना उपोषण करू नका अशी वारंवार विनंती केली. तुम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. आमचा शब्द आहे. आमचा शब्द आहे. आम्हीच मागच्यावेळी आरक्षण दिलं होतं. त्यामुळे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. फक्त थोडा वेळ द्या. आम्ही आरक्षण देणारच आहोत. तुम्ही टोकाचा निर्णय घेऊ नका, अशी वारंवार विनंती गिरीश महाजन यांनी केली. पण जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. तुम्ही दोन दिवसात गुन्हे मागे घेतो म्हटला होता. अजूनही घेतले नाही. गुन्हे मागे घेतले नाही, आरक्षण काय देणार? असा सवालच मनोज जरांगे पाटील यांनी केला.

उपोपण करु नका, महाजन यांची विनवणी

समितीचा अभ्यास सुरू असून आरक्षण लवकरच मिळेल, काहीतरी सकारात्मक होईल, साखळी ठेवा मात्र आमरण उपोषण नका करू, असं म्हणत गिरीश महाजन यांच्याकडून जरांगेना विनवणी करण्यात आली. समितीचा अभ्यास 40 वर्षांपासून सुरूच आहे, मराठा आंदोलकांवरील खटले दोन दिवसात मागे घेतो, ते अजून मागे घेतलेले नाहीत, असं प्रत्युत्तर जरांगे यांनी महाजन यांना दिलं आहे.

मराठ्यांवरील गुन्हे कधी मागे घेणार?

मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेतो, तुम्ही म्हटले होते, अजून एकही गुन्हा मागे घेतलेला नाही. तुमच्याकडून तेही होत नाही आणि तुम्ही आरक्षण काय देणार, असं जरांगे यांनी महाजन यांना म्हटलं. आता 15 -16 जणांनी आत्महत्या केल्या त्याबद्दलही सरकारला काही सहानभूती नाही. आत्महत्याग्रस्त कुटुंबाना मदत करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनाआदेश द्या, असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे.

गिरीश महाजन – तुम्ही उपोषण मागे घ्या, आपण मार्ग काढू, मराठा आरक्षणासाठी सरकार गंभीर आहे. देऊन टाका, देऊन टाका, असं आरक्षण देता येणार नाही. आम्हाला असं आरक्षण द्यायचं आहे, त्याला कुणीही चॅलेंज करु शकत नाही. न्यायालयात आव्हान देता येणार नाही. त्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या, समाजाला आंदोलन उग्र करु नका, आत्महत्या करु नका, असं मराठा समाजाला आवाहन करण्याची मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे.

जरांगे – तुम्ही १५दिवस मागितले आम्ही ४० दिवस दिले, तुमच्या शब्द आम्ही पाळला. तुम्ही आमच्या लेकरांची जीवन कधीपर्य़ंत उद्धस्त करणार आहात. १६ मराठा बांधवांच्या आत्महत्यांबाबत सरकारला सहानुभूती नाही. त्यांच्या मागे त्यांच्या लेकराबाळांना मदत जाहीर करा.

हे ही वाचा : 

पुण्यातील कोयता गॅंगने हॉटेल चालकावर केला हल्ला

बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदेंची धाकधूक वाढली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss