महाराष्ट्र विधानसभा मतदान निवडणूक २० नोव्हेंबर रोजी पार असून, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया सुरु होईल. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मुख्यमंत्रीबाबत राजकीय चर्चा रंगल्या आहेत. उद्या सकाळी १० वाजता मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. तसेच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. काही तासामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या कारणामुळे उमदेवारांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. तर दुसरीकडे या गोष्टीकडे लक्ष लागले आहे की उद्या कोण विजयाचा गुलाल उधळणार आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. आता त्यातच महाविकास आघाडी आणि महायुतीत कोण असणार मुख्यमंत्री यावरून चर्चा सुरु आहे.
नुकतंच प्रसारमाध्यामांशी संजय राऊतांनी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्रिपदाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी त्यावर स्पष्टपणे भाष्य केले आहे. राज्यातील मुख्यमंत्रिपदाचा निर्णय हा महाराष्ट्र मुंबईतून होईल. काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत, ते दिल्लीतून मुंबईला येतील. संजय राऊत यांनी असं विधान दिल आहे की मी उद्या सकाळी १० नंतर मुख्यमंत्री कोण असेल हे सांगेन. महाराष्ट्रात महिलांनी गुलामी विरोधात बंड करुन मतदान केलेलं आहे. तसेच १६० जागा आम्ही जिंकलो आहे. यावर आमची सर्व घटक पक्षांसोबत चर्चा केली आहे. शरद पवारांना मी लवकरच भेटणार आहे. १६० जागा आम्ही जिंकल्यानंतर राज्यपालांनी कितीही प्रयत्न केले, मात्र निवडणूक पूर्वी ज्याचं बहुमत आहे, त्यांना राज्यपालांना बोलवावं लागेल, संजय राऊतांनी असे म्हंटल आहे.
हातातील ताट भाजपची लोक खेचण्याची प्रयत्न करतील
महाराष्ट्र मुंबईतून मुख्यमंत्री पदाचा निर्णय होईल, काँग्रेसचे जे प्रमुख नेते दिल्लीतून येथे येतील. त्यामुळे त्यांना मँडेट घेऊन यावं लागेल. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आम्ही कोणताही वेळ न घालवता घेऊ. नाहीतर भाजपची लोक हातातील ताट खेचण्याचा प्रयत्न करतील. लोक इतके ते क्रूर आणि निर्घृण आहेत. ते घाईघाईत गौतम अदनालाही मुख्यमंत्री करतील, असा घणाघात टीका संजय राऊतांनी केला आहे.
“जयंत पाटील हे उत्तम राज्य चालवू शकतात”
उद्या सकाळी १० वाजता मुख्यमंत्री कोण होणार हे मी सांगणार आहे. तसेच महाविकासआघाडी ही स्वबळावर सत्तेत येणार आहे. त्यामधील गाडीत बसलेले आहेत ते सर्व ड्रायव्हर निष्णात आहेत. जयंत पाटील हे एक उत्तम ड्रायव्हर आहेत. त्यांना उत्तम वाहन चालवता येत. हा माझा अनुभव आहे. पण काहीलोकांना ड्रायविंगच पॅशन असत. म्हणून जयंत पाटील हे एक उत्तम राज्य चालवू शकतात. उद्धव ठाकरे यांना देखील फारसा अनुभव नव्हता तरी त्यांनी देखील त्यांनी एक उत्तम सरकार चालवलं. असे संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आहे.
हे ही वाचा:
Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान