राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि माजी केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग (Satyapal Singh) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीका करत महायुतीला (Mahayuti) मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
ठाण्यातील भाजप मिडिया सेंटरमध्ये आज (बुधवार, ६ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, प्रदेश प्रवक्ते सागर भदे, शरद पुरोहीत आणि कमलेश आचार्य आदी उपस्थित होते. आत्मनिर्भर आणि पुनर्विकसित महाराष्ट्र बनवण्यासाठी राज्यात महायुतीला साथ द्या. असे आवाहन त्यांनी केले.
ते यावेळी म्हणाले, “देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी जेव्हापासून आले, तेव्हापासून देशातुन आतंकवाद जवळपास संपला आहे. गेल्या १० वर्षात सबका साथ.. सबका विकास हे सुत्र अवलंबुन देशाला प्रगतीच्या वाटेवर नेले आहे. किंबहुना गुलामगीरीची सारी चिन्हे नष्ट करून देशाला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर भारत बनवुन संपूर्ण जगात भारताचा सन्मान वाढवण्याचा निर्धार नरेंद्र मोदी यांनी केला आहे. एकीकडे जात, धर्म, भाषा आणि प्रांताच्या नावे विरोधक धृवीकरण करून समाजात वादंग निर्माण करीत आहेत. तर दुसरीकडे तुष्टीकरण न करता भाजप सर्वाना समान न्याय देत आहे. मोदी सरकारने लोकांना आस्थेचा मार्ग दाखवला, तर काँग्रेसने प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावरच आक्षेप नोंदवला,” असे ते म्हणाले.
“केंद्राने देशातील ८० कोटी जनतेला मोफत शिधा देण्याबरोबरच विविध योजना यशस्वीपणे राबवल्या. तरी, लोकसभेच्या वेळेस मविआ आघाडीने फेक नॅरेटीव्ह पसरवुन यश मिळवले. पण आता आघाडीच्या या खोट्याचा पर्दाफाश झाला असुन लोक आता त्यांच्या बतावणीला भुलणार नाहीत. कारण जनतेला विकास हवा आहे, राज्यात भाजप, महायुती सरकारने लाडकी बहिण योजना असो वा गरीब कल्याणाच्या अन्य योजनांच्या माध्यमातुन महिलांचा सन्मान केला.महाराष्ट्रात ८५० कोटी सायबर क्राईमच्या सुरक्षेसाठी तरतुद केली. तेव्हा, आत्मनिर्भर आणि पुर्णविकसीत महाराष्ट्र बनण्यासाठी महायुतीला साथ द्या,” असे आवाहन सत्यपाल सिंग यांनी केले आहे.
हे ही वाचा:
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर