spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

गौप्यस्फोट आणि फटकेबाजी, ’२३ तारखेला गुवाहाटीचं तिकीट पाहिजे…’, उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काय-काय म्हणाले?

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत.

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. “आमची मशाल पेटली की सर्वांचं सगळंच गरम होईल. आता तुम्ही बघा मशाल कशी पेटली आहे. तोबा गर्दी होते. अनेक लोकं वाट पाहत आहेत. त्यांनी जो गद्दारीचा वार केला तो केवळ शिवसेनेवरच केला नाही, आपल्या आई असलेल्या महाराष्ट्राच्या कुशीवर केला” आहे, असा आरोप उद्धव ठाकरें यांनी केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आहे. आज सांगोला मध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. उद्धव ठाकरें यांनी सांगोल्याचे उमेदवार दीपक आबा साळुंखे यांच्या प्रचारासाठी आज ही सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे सांगोल्याचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्यावर प्रचंड टीका करत जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी असा गौप्यस्फोट केला आहे की ते म्हणाले, विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीवेळी आपण दीपक आबा साळुंखे यांनाच तिकीट देणार होतो. “मी दीपक आबांना सांगतो, तुम्ही इथल्या तालुक्यांच्या समस्यांचा पाढा वाचलात. पण मी हे निवेदन हातात घेणारच नाही. तुम्ही जर आमदार होऊन विधीमंडळात आलात तर आणि तरच मी हे निवेदन घेणार. आता हे सर्व तुमच्या वरती आहे, दीपक आबांना पाठवायचं की नाही. पण त्यांना तुम्हाला पाठवावंच लागेल. मला सांगा रेल्वेत कुणाची ओळख आहे का? नाही, तिकीट पाहिजे. 24 तारखेचं एकच तिकीट पाहिजे, ते सुद्धा गुवाहाटीचं. परत जाऊद्या त्यांना. काय झाडी, काय डोंगर…, बसा तिकडे झाडं मोजत बसा”, असा टोला उद्धव ठाकरेंनी केला आहे.

देव संधी देत असतो. प्रत्येकाचं एक नशीब असत. या संधीच तुम्हाला सोन करायचं की या संधीच माती करायचं हे ज्याचं त्याने आता ठरवायचं आहे. आपण गेल्यावबेली एका गद्दाराला उमेदवारी दिली. त्यावेळी तुम्ही सर्वांनी त्याला संधी दिली. पण त्याने या संधीच सोन नाही तर या संधीची माती केली. किती माज म्हणजे माज असायला पाहिजे? त्यांना हे माहित नव्हतं की ज्यांनी त्यांना मोठं केलं हे सगळेच जण त्यांचा माज सुद्धा उतरवू शकतात. आता मी आलो आहे. त्यांचा माज उतरवायला, त्या गद्दार लोकांना गाढायला आलो आहे. मी त्या गद्दारांच्या छाताडावर पुन्हा एकदा भगवा रोवायला आलो आहे. अरे या गद्दारांना काय वाटलं? ते लोक गद्दार म्हणजे सर्व लोकं गद्दार? महाराष्ट्राचा हा इतिहास आहे. गद्दारांना महाराष्ट्र कधीही क्षमा करत नाही. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘तिथला डोंगर तू पाहिलास, 23 तारखेला रायगडाचं टकमक टोक दिसणार’ “या गद्दाराला सांगायचं आहे की तिथला डोंगर तू पाहिलास, मात्र इथल्या रायगडाचं टकमक टोक नाही पाहिलंसहे मात्र 23 तारखेला तुला ते दिसणार आहे. त्या टकमक टोकावरुन हे सर्वजण तुझा कसा राजकीय कहरकरतील ते बघच. मग तुझी जी काय मस्ती होती… काय नव्हतं दिलं? सर्व दिलं होतं. मी हे प्रमाणिकपणाने सांगतो, दीपक आबांना मी गेल्यावेळीच उमेदवारी देणार होतो. या गोष्टीवरती आपलं बोलणंही झालं होतं. पण त्यावेळी मध्येच एक धरण फोडणारा खेकडा घुसला. तो कोण तुम्हाला माहिती आहे, त्याने सांगितलं की, साहेब माझं ऐका. हा शंभर टक्के निवडून येत आहे. मी म्हटलं, ठिक आहे. मी त्यावेळी दीपक आबांना विनंती केली की, साहेब जरा माफ करा. असं काही मला करावं लागत आहे. मला त्यांचं कौतुक एवढ्यासाठी वाटतंय की, त्यांना सांगितल्यानंतर लबाडी केली नाहीआणि गद्दारी केली नाही. ते म्हणाले, ठिक आहे, उद्धवजी मी निवडून आणतो. शिवसैनिक हा असा पाहिजे, तुमच्यासाठी लढणारा. यालाच म्हणतात सैनिक”, सभेत उद्धव ठाकरेंनी अशा शब्दांत कौतुक केलं.

‘गद्दाराने आई असलेल्या महाराष्ट्रावर वार केला’ “आता त्यांनी सांगितलं ना, किती वर्षे थांबलं होतं. आता झालं. त्यांच्यामागे किती स्पीड ब्रेकर होते ते आपण स्पीडब्रेकर सपाट केले आहेत. त्यामध्ये एक ढेकुळ आहे ते ढेकूळ देखील आपण सपाट करुन टाकायचं आहे. आता निवडणूक रंगात यायला लागली आहे. आता साधरणत: मला पत्रकारांची एक आठवड्यापूर्वी फोन येत होते. म्हणाले की, यावेळी लोकसभेसारखं वातावरण गरम होताना दिसलं. तेव्हा त्यांना मी म्हटलं थांबा जरा. आमची जेव्हा मशाल पेटेल तेव्हा सर्वांचं सगळं गरम होईल. आता बघा कशी मशाल पेटली आहे. ‘तोबा’ गर्दी होते. लोकं वाट पाहत आहेत. त्याने जो वार गद्दारीचा केला तो केवळ शिवसेनेवर केला नाही तर तो वार त्याने आपल्या आई असलेल्या महाराष्ट्राच्या कुशीवर केला” आहे. असा निशाणा उद्धव ठाकरेनी साधला आहे.

Latest Posts

Don't Miss