Wednesday, April 17, 2024

Latest Posts

ठाकरे-केजरीवाल भेटीवर फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भारतीय जनता पार्टीविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भारतीय जनता पार्टीविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी नितीश कुमार मुंबईत आले होते. त्यांनी मुंबईत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. त्यापाठोपाठ २४ मे रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आणि आता केजरीवाल उद्या शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे भाजपाविरोधात अनेक विरोधक एकत्र येत आहेत. यात काही शंकाच नाही. मात्र या भेटीगाठीवर विरोधकांनी चांगलाच टोला लगावला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी भेटीवर ते म्हणाले की, मला अतिशय आनंद आहे. केजरीवाल आणि उद्धव ठाकरे भेट होवून त्यांना एकमेकांची गरज लागतेय, म्हणजे भाजपला पराभूत करण्याकरिता केजरीवाल कोणाशी ही हात मिळवणी करण्यासाठी तयार आहेत आणि उद्धव ठाकरे कोणासोबत देखील बसायला तयार आहेत. असे मत देवेंद्र फडणीस याची व्यक्त केले आहे. यातूनच भाजपची ताकत दिसत आहे. मात्र २०१९ साली यांनी हा प्रयोग करून पाहिला आहे, हा कधीही यशस्वी झाला नाही आणि होणार देखील नाही. अशी खोचक प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. 

यावेळी देवेंद्र फडणवीस याना जलयुक्त शिवार योजनेसंदर्भात विचारणा केली असता, तर जलयुक्त शिवारवर बोलताना फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात झाली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्यात आला आहे. जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली यावी हे, ध्येय असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आज जलशिवार योजनेअंतर्गत बैठक पारपडली या बैठकीमध्ये प्रत्येत जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्व जिल्हे आता काम करणार आहेत. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेला देखील गती देण्यात आली आहे. जलयुक्त शिवार एक मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लिडरशीप घेतली आणि त्यातून गावात जागृती निर्माण झाली. तशीच लिजरशीप जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून RAJ THACKERAY भावुक,। khupte tithe gupte

“त्या” मागण्यांमुळे उद्धव ठाकऱ्यांना जावे लागणार नव्या संकटाला सामोरे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss