Saturday, June 3, 2023

Latest Posts

अपयशी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डांचे गद्दारांच्या साथीने मुंबई जिंकण्याचे दिवास्वप्न, अतुल लोंढे

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (Bharatiya Janata Party National President J. P. Nadda) यांचे गृहराज्य असलेल्या हिमाचल प्रदेशात काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव करत विधानसभेवर विजयी पताका फडकवली आहे.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (Bharatiya Janata Party National President J. P. Nadda) यांचे गृहराज्य असलेल्या हिमाचल प्रदेशात काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव करत विधानसभेवर विजयी पताका फडकवली आहे. शिमला महानगरपालिकेतही भाजपाचा पराभव काँग्रेसने केला आहे. त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात भाजपचा एकही उमेदवार ते निवडून आणू शकले नाहीत. कर्नाटकातही नड्डांच्या भाजपाचा सुपडासाफ झाला. नड्डा म्हणजे पराभव हे चित्र स्पष्ट असताना काही गद्दारांच्या साथीने मुंबई महानगरपालिका जिंकण्याचे दिवास्वप्न जे. पी. नड्डा पहात आहेत, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी म्हटले आहे.

लोंढे पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला देशभरातील जनता कंटाळलेली आहे. विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचारात भाजपा आकंठ बुडालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जनता प्रतिसाद देत नाही तर जे. पी. नड्डांना कोण प्रतिसाद देणार? परंतु राणा भिमदेवी थाटात मुंबई महानगरपालिका जिंकण्याच्या वल्गना ते करत आहेत. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या कांदीवलीमधील कार्यक्रमाला १०० माणसेही उपस्थित नव्हती. जे पी. नड्डांना त्यांचे गृहराज्य हिमाचल प्रदेशने स्विकारले नाही तर मुंबईची जनता त्यांना कशी साथ देईल. भाजपा व जे. पी. नड्डा यांनी कितीही जोर लावला तरी मुंबई महानगरपालिका जिंकणे त्यांना शक्य नाही. मुंबईकर जनता भाजपाचे राजकारण ओळखून आहे, ते त्यांना थारा देणार नाहीत, असेही लोंढे म्हणाले.

तर आज प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर हे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस त्याच सोबत जे. पी. नड्डा यांच्या सह अनेक नेतेमंडळी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलत असताना खासदार जे.पी. नड्डा म्हणाले की, आज औद्योगिक क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. बदलत्या काळानुसार कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज बनली आहे.पुरवठादारास औद्योगिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदल आणि तशी मागणी कळत नाही त्यामुळे मागणी करणाऱ्याला काय हवे ते जाणून घ्या टेक्निकल प्रशिक्षण गरजेचे.नोकरी सहित प्रशिक्षण गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात अपग्रेड व्हावे लागेल.१० लाख रोजगार देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे.२ लाखांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रधानमंत्री यांनी दिले आहेत.१३ लाखांहून अधिक जणांना प्रशिक्षण दिले आहेत. देशात स्कील डेव्हलपमेंटची गरज होती हे लक्षात घेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना केली .

हे ही वाचा : 

करिअरमध्ये आईची भक्कम साथ…, सईने सांगितलं आईसोबतचे नातं

क्रांती रेडकरने पतीवर लावलेले आरोप फेटाळून लावले, काय म्हणाली क्रांती

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण डीके शिवकुमार की सिध्दरमैया? दिल्लीत फैसला | Karnataka Election 2023

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss