Thursday, November 30, 2023

Latest Posts

कापसेवाडीत शेतकरी मेळावा होणार – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षशरद पवार हे दिवाळी झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. शरद पवार हे 16 नोव्हेंबरला माढा लोकसभा मतदारसंघातील कापसेवाडीत होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षशरद पवार हे दिवाळी झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. शरद पवार हे 16 नोव्हेंबरला माढा लोकसभा मतदारसंघातील कापसेवाडीत होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सोलापूर, उस्मानाबाद आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सध्या या तिन्ही जिल्ह्यात बेदाणा, दूध आणि टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. या संदर्भात शरद पवार हे कापसेवाडीत शेतकरी मेळावा घेणार आहेत.

तब्बल 94 हजार टन बेदाणा कोल्ड स्टोरेजमध्ये पडून

सध्या राज्यात 2 लाख 57 हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले आहे. यातील तब्बल 94 हजार टन बेदाणा योग्य दर मिळत नसल्याने अजुनही कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहे. याबाबत शेतकऱ्यांनी बेदाण्यावरील निर्यात शुल्क कमी करुन आयात शुल्क वाढवण्याची मागणी केली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी कृषीनिष्ठ परिवाराचे नितीन बापू कापसे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी आज वाय बी चव्हाण सेंटर मुंबईत येथे शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी तातडीने कापसेवाडी येठील मेळाव्याला येण्याचं मान्य केल्याची माहिती नितीन बापू कापसे यांनी दिली आहे.


शरद पवार यांच्या माढा दौऱ्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. 23 ऑक्टोबरच्या दौऱ्याची संपूर्ण तयारी देखील आयोजकांकडून करण्यात आली होती. मात्र शरद पवारांचा दौरा अचानक रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्या दिवशी शरद पवार हे बारामतीतून सोलापूरला न जाता शरद पवार थेट पुण्याला गेले. हा दौरा का रद्द करण्यात आला याची कोणतेही कारण समोर आले नाहीत. अचानक दौरा रद्द झाल्यानं कार्यकर्ते देखील संभ्रमात पडले होते. तसेच अनेक शेतकऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती.

हे ही वाचा : 

मराठा आंदोलनात घुसलेत समाजकंटक, पोलीस झालेत मूक प्रेक्षक. फडणवीसांवर जोरदार टीका

WEDDING INSURANCE| लग्नासाठी पण INSURANCE असतो का?| Is there Insurance for Marriage?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss