कर्नाटकच्या प्रमुख राजकीय नेत्या आणि राज्यातील कॅबिनेट मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सुदैवाने त्या बचावल्या आहेत. हा अपघात पुणे – बंगलोर बंगळुरू महामार्गावर कित्तूर येथे पहाटे ५ वाजता घडला. एका झाडाला त्यांची कार आढळली. बंगळुरू येथून बेळगावला येत असताना अचानक समोर कुत्रा आल्यामुळे कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडावर आदळून हा भीषण अपघात घडला. याबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री व सहकारी मंत्र्यांनी फोनवरुन घटनेची माहिती घेत विचारपूस केली.
अपघातानंतर कारच्या सर्व सहा एअरबॅग उघडल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, अपघातात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाठीवर व चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली, तर आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्हीया डोक्याला दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या त्याचा भाऊ चन्नराज हट्टीहोळी यांसोबत प्रवास करत होत्या.चन्नराज हट्टीहोळी हे कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य आहेत. या अपघातात टोयोटा इनोव्हा हायक्रॉस या कारचा पुढचा भाग पूर्णपणे निकामी झाला.
या अपघाताची माहिती मिळताच सहकारी मंत्र्यांनी व निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांंनी फोनवरुन विचारपूस केली. तसेच, काही समर्थकांनी रुग्णालयाकडेही धाव घेतली. सुदैवाने सध्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व आमदार चन्नराज हट्टीहोळी यांची प्रकृती स्थिर आहे.
हे ही वाचा:
अजितदादा….दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडले तर…काय म्हणाले Rohit Pawar?
Central Railway चा खोळंबा; उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी