अखेर वाल्मिक कराड आला पोलिसांच्या शरणात. गेल्या अनेक दिवसापासून चर्चत असलेला संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा नाव सतत समोर येत आहे. आज पुण्यात सीआयडी समोर शरण आला. वाल्मिक कराड हा तीन आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तीन आरोपी फरार आहेत. यामध्ये वाल्मिक कराड याचेही नाव होते. वाल्मिक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता. अखेर तो आज पोलिसांच्या शरणात आला.
आज शरण येण्यापूर्वी त्याचा एक विडिओ समोर आला होता. त्यात त्याने खंडणीचा गुन्हा खोटा आहे आणि संतोष देशमुख याच्या हत्याप्रकरणाचा गुन्हा देखील खोत असल्याचा त्याने सांगितलं आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये
मी वाल्मीक कराड, केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे, पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील. त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी ती मी भोगायला तयार आहे असं वाल्मीक कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका