Saturday, June 3, 2023

Latest Posts

बीडच्या राजकारणात पहिल्यांदाच मुंडे भाऊ आणि बहीण एकत्र

महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे भावा-बहिणीच्या जोडीची चांगलीच चर्चा असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या बहिण-भावामध्ये सातत्याने वादाच्या किंवा मतभेदांच्या बातम्या समोर येत असतात. अनेकदा जाहीर मंचावर हे बहीण भाऊ एकत्र आलेले दिसतात.

महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे भावा-बहिणीच्या जोडीची चांगलीच चर्चा असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या बहिण-भावामध्ये सातत्याने वादाच्या किंवा मतभेदांच्या बातम्या समोर येत असतात. अनेकदा जाहीर मंचावर हे बहीण भाऊ एकत्र आलेले दिसतात. पण एकाच मंचावरुन ते एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीकाही करताना दिसतात. तर कधी धनंजय मुंडे रुग्णालयात आजारी असताना बहीण पंकजाताई त्यांना फोन करुन तब्येतीची विचारसपूस करतात. दोन भाव बहिणींमधील राजकीय हेवेदावे आणि दुसरीकडे त्यांचे नाते या दोन्ही गोष्टी झळकत असतात. या भावंडांमधील हे नातं असंच आहे.

नुकतंच जवाहर शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. मात्र गोपीनाथ गडावर असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात दोन्ही बाजूने संघर्ष टाळण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं चित्र समोर येताना दिसत आहे. बीडच्या राजकारणात पहिल्यांदाच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित येऊन वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ठरवली आहे. त्यामुळे वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मुंडे बंधू-भगिनी एकत्र आल्याची चर्चा रंगू लागली आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ आज त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे, अॅड. यशश्री मुंडे आणि त्यांच्या मातोश्री प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे यांनी ही वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.

यामुळे या साखर निवडणुकीच्या जागा वाटपासाठी आता कोणती चुरस बघायला मिळणार आहे याबाबत आता चर्च सुरु झाल्या आहेत. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार, २१ जागांसाठी (संचालकांच्या निवडीसाठी) ही निवडणूक पार पडणार आहे. यापैकी ११ जागा या पंकजा मुंडे यांच्या गटाकडे असतील. तर १० जागांवर धनंजय मुंडे यांचे उमेदवार असतील. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये यापूर्वी ज्या नेत्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, अशा सगळ्या उमेदवारांना दोन्ही बहीण-भावाने बाजूला ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा : 

तुषार भोसलेंचे संजय राऊतांना आव्हान, राऊतांनी हिंदू समाजाची माफी मागावी

कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंत जड वाहनांनी ठेवा वेगमर्यादा कमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss