बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक केली आहे. त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्याची तब्येत बिघडल्याने त्याचा आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. दरम्यान, वाल्मिक कराड ज्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहे तिथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना वाल्मिक कराडच्या सुरक्षेसाठी जिल्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या आयसीयूमध्ये हलवण्यात आला आहे. याविषयी आमदार सुरेश धस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर असं असेल तर हे योग्य नाही, मी रुग्णालय प्रशासनाशी यासंदर्भात बोलेन, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे.
सुरेश धस म्हणाले, महादेव मुंडे यांचा 15 महिन्यांपूर्वी जो खून झाला आहे, त्याचा तपास लागत नाहीये.. हा तपास एलसीबीकडे देण्यात यावा..भदाणे, केंद्रे ही ठराविक पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत.. यांना पण आकाने बसवलं आहे..महादेव मुंडे प्रकरणी पोलीस अधिक्षकांसोबत चर्चा केली. मुंडेंचे खूनी पुढच्या 15 दिवसांत सापडले पाहिजे. बीड जिल्ह्यात पोलिस दल पुर्ण बदनाम झालंय..कराडला कोर्टातून जेलमध्ये नेताना कराडचा पीए कसा बसेल त्याची काळजी पण बल्लाळ घेत होते. महादेव मुंडेंचा खून झाला तेव्हा सुशील कराड आणि श्री कराड दोन मुलांनी पोलिस निरिक्षक रविंद्र सानप, विष्णू फड, गोविंद भदाणे, भास्कर केंद्रे यांच्यासह सहा मोबाईल क्रमांकावर अर्धा तासांत 150 वेळा फोन केलाय..
खून झाला तेव्हा हे फोन का केले गेले? याचा तपास झाला पाहिजे. मी आरोपी मानत नाही पण 150 कॉल करण्याची गरज काय? मुंबईवरुन दुबे नावाचे सायबर तज्ज्ञ आहेत.. त्यांनी त्यांचं मत नोंदलेलं आहे, असंही धस यांनी म्हटलं आहे.
मकोका कारवाईतील चार आरोपींची होणार ओळख परेड
सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार आरोपींची होणार ओळख परेड होणार आहे. हे आरोपी मकोका सह सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील देखील आरोपी आहेत.. ही ओळख परेड बीड कारागृहात पार पडणार आहे.
भाजप आमदार सुरेश धस उद्या सकाळी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली आहेत. सकाळी 11 वाजताची त्यांनी अधीक्षकांकडे वेळ मागितली होती. देशमुख हत्या प्रकरणासह इतर प्रश्नांवर सुरेश धस यांची चर्चा झाली आहे. देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन सीसीटीव्ही व्हिडिओ समोर येत आहेत त्या अनुषंगाने देखील धस यांची अधीक्षकांसोबत चर्चा झाली.
हे ही वाचा :