Thursday, March 28, 2024

Latest Posts

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बारसूमध्ये जाहीर सभा घेण्यास परवानगी नाकारली

राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आणि समर्थनार्थ सध्या चालू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या, शनिवारी बारसूमध्ये जाहीर सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. बारसू येथील रिफायनरीचा मुद्दा तापला आहे.

राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आणि समर्थनार्थ सध्या चालू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या, शनिवारी बारसूमध्ये जाहीर सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. बारसू येथील रिफायनरीचा मुद्दा तापला आहे. याच परिसरातील प्रकल्पविरोधी ग्रामस्थांची भेट देऊन सभा घेण्यासाठी येत असलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सभेची परवानगी प्रशासनाकडून नाकारण्यात आली आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या उद्याच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोकणातील राजापूर बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. काही ग्रामस्थांचा याला विरोध आहे. याच ग्रामस्थांची भेट घेण्याकरता आणि त्या ठिकाणी सभा घेण्याकरता उद्या उद्धव ठकरे राजापूर बारसू येथे येणार आहेत. मुंबईतील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी दौऱ्याची घोषणा केली होती. याचबरोबर प्रकल्पाच्या समर्थनार्थ भाजपासह विविध संघटनांनी आयोजित केलेल्या मोर्चालाही पोलिसांनी मनाई केली आहे. त्यामुळे आता बदललेल्या कार्यक्रमाबाबत लोकसत्ताला सांगितले की, ठाकरे उद्या सकाळी १० वाजता साखरकोंभ येथे हेलिकॉप्टरने पोहोचणार आहेत. तेथून ते बारसू येथील कातळशिल्पाला भेट देऊन गिरमादेवी येथे ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत

त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन दुपारी ते महाडला रवाना होणार आहेत.या रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणासाठी चालू असलेल्या ड्रिलिंगच्या कामाला स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या आठवड्यात जोरदार विरोध केल्याने हिंसक वळण लागले. त्यानंतर तूर्त आंदोलन स्थगित झाले असले तरी गेल्या पुन्हा आंदोलक बारसू परिसरातील सड्यावर गोळा होऊ लागले आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी या परिसरात येण्याचा मनोदय व्यक्त केल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता दिसल्याने पोलिसांनी जाहीर सभेला परवानगी नाकारली.ठाकरेंच्या दौऱ्याला प्रत्युत्तर म्हणून उद्या प्रकल्प समर्थकांकडून शहरात मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. पण त्यालाही पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान, प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्ष अमोल बोळे, पत्नी मानसी आणि इतर सातजणांना ताब्यात मनाई आदेश मोडल्याने पोलिसांनी ‌ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा : 

अजित पवारांकडून निर्णयाचे स्वागत, तर पुढील ८ दिवस करणार राज्यभर दौरा

देव आणि संघटना यातील फरकही पंतप्रधानांना कळू नये हे देशाचे दुर्भाग्य, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss