Friday, April 19, 2024

Latest Posts

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची सुटका

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात झाली होती. त्यानंतर अखेर त्यांची सुटका करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदा ठरवून तातडीने त्यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात झाली होती. त्यानंतर अखेर त्यांची सुटका करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदा ठरवून तातडीने त्यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निकालामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांनी जल्लोष व्यक्त केला आहे. मंगळवारी इमरान खान यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर कोठडीमध्ये आपल्याला एखादा दहशहतवाद्यासारखी वागणूक देण्यात येत आहे मारहाण केली जात आहे असे आरोप त्यांनी कोर्टामध्ये केले. आज सकाळी ११.३० वाजता इस्लामबाद कोर्टामध्ये त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे. इम्रान खांबावर अनेक आरोप लावण्यात आले होते. इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचार, आर्थिक हेराफेरी, दहशतवाद, दंगली भडकवणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

पीटीआय सरकारच्या काळामध्ये अल कादिर ट्रस्टला काही प्रकरणांमध्ये इम्रान खान यांनी त्यांना मदत केली होती. या मदतीमुळेच अल कादिर ट्रस्टला फायदा झाला पण सरकारचा लाखो रूपयांचा महसूल बुडाला आणि अल कादिर युनिव्हर्सिटीसाठी परवानगी देण्याच्या बदल्यात इम्रान खान यांना मोठया प्रमाणामध्ये जमीन देण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांनाही आरोप ठरवण्यात आले आहे.

मागील वर्षात एप्रिल महिन्यामध्ये इम्रान खान यांचे सरकार विश्वासदर्शक ठराव हरणे आणि पाकिस्तानमध्ये सत्ताबदल झाला. त्यानंतर नव्या सरकारच्या काळामध्ये इम्रान खान यांच्यावर नवे खटले आणि आरोप दाखल होण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे इम्रान खान हे पाकिस्तानमध्ये एकामागोमाग एक रॅलीज काढायला लागले. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) मुख्य न्यायधीशांनी इम्रान खान यांना अटक केल्यानंतर एनएबीला चांगलेच फटकारले होते. तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी करण्यात आली.

हे ही वाचा : 

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss