spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार देवेंद्र फडणवीस

राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आता मुख्यमंत्री ठरत पर्यंत एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री आहे. राज्यात आता काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला १० कोटींचा निधी दिल्याचा जीआर काढण्यात आला होता. प्रशासनाने काढलेला हा जीआर योग्य नसून त्याचे औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी करण्याचे आदेश दिले जातील असं भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.

राज्य सरकारनं वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये निधी जाहीर करण्यात आला होता. वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधांसाठी तसंच बळकटीकरणासाठी हा निधी वितरित केल्याचं सांगण्यात आलं होत. राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. तो निर्णय जरी केल्यानंतर लागलीच मागे घेतला आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असताना अश्या प्रकारे धोरणात्मक निर्णय घेता येत नसतानाही, प्रशाकीय पातळीवर वक्फ बोर्डाला निधी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे या निर्णयावर जोरदार टीका होताच राज्य सरकारवर हा जीआर मागे घेण्याची नामुष्की आली आहे. याबाबत त्याची चौकशी करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्टवर सांगितलं.

वक्फ बोर्डला निधी दिल्याचा एक जीआर काढण्यात आला, ही प्रशासकीय पातळीवरील चूक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना असा परस्पर आदेश काढता येत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. यावेळी कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. असं असताना देखील हा आदेश प्रशासकीय पातळीवर निघाला आहे अशी चर्चा होती. त्यामुळे ती चूक तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.

वक्फ बोर्डाला निधी दिल्याचा जीआर ही प्रशासकीय चूक असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यानंतर मुख्य सचिव सुजाता सौनिकांकडून जीआर मागे घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना असा परस्पर आदेश काढता येत नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
राज्यसरकारने जीआर मागे घेण्याची नामुष्की आली आहे. याबाबतची चौकशी करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्ट केलं आहे.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss