spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचे व्यक्तिगत पातळीवरचे आरोप प्रत्यारोप

विधान परिषदेत एका चर्चेदरम्यान एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. आरोप-प्रत्यारोप अगदी व्यक्तिगत पातळीवरचे झाले. जळगावात अवैध धंदे कोणाच्या आशिर्वादाने सुरु आहेत? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला. त्यावर गिरीश महाजन यांनी खडसेंच्या कुटुंबातील लोकांना तीन वर्ष जेलमध्ये काढावी लागलली असं उत्तर दिलं.

आधी जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे यांचा वर्चस्व होतं, तेव्हा ते भाजपमध्ये होते. गिरीश महाजन यांचं राजकीय वजन वाढू लागले आणि नंतर खडसेंची भाजपमधील ताकद हळूहळू कमी होत गेली. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस हे एक होती. आता शरद पवार गटात एकनाथ खडसे विधान परिषदेत आमदार आहेत. विधानसभा, लोकसभेचीच नव्हे, जिल्ह्याच्या राजकारणात कोणतीही निवडणूक असली तरी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन ती जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावतात.

आता एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे कट्टर विरोधक असल्याचे समजले जातात. विधानपरिषद दरम्यान एका चर्चेत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात अगदी व्यक्तिगत पातळीवरचे आरोप – प्रत्यारोप झाले.

वाळू माफियाची प्रकरण घडत आहेत, यामागे कोणाचा हात आहे? सरकार पाच वर्ष तुमचं होतं, सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही? सरकारने बांगड्या घातल्यात का? वाळू माफियासंदर्भात तुम्ही बांगड्या घातल्या आहेत का? का कारवाई करता येत नाही? कापसाला का भाव देत नाही? मोठमोठ्या घोषण करता, सरकार कापसाला का भाव देता येत नाही, कापसासाठी शेतकरी मरतोय” असं एकनाथ खडसे म्हणाले.

त्यावर गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं. “चाललं काय, काय बरोबर चाललय. तुम्ही रॉयल्टी चोरी करता, स्टॅम्प ड्युटीमध्ये चोरी करता. घरची लोकं तीन-तीन वर्ष बसलेत जेलमध्ये, अजून काय इथे छाती ठोकपणे बडबड करायची, अहो चोऱ्या कोणी केल्या? तुमच्या घरात काय झालं? पोराला का मारलं? का तोंड काळ केलं? मी तर म्हणतो नार्को टेस्ट करा” असे व्यक्तीगत आरोप गिरीश महाजन यांनी केला.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss