spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

ते Eknath Shinde यांनाही दहशतवादी म्हणतील, Girish Mahajan यांचा Sanjay Raut यांना टोला

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच सर्व राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) केलेल्या टिकेवरून आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

गिरीश महाजन यांनी आज (रविवार, १० नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले, “राज्यात सुरू असलेल्या विविध लोककल्याणकारी योजना अशाच पद्धतीने सुरू राहतील. राज्यात पुन्हा एकदा सरकार आल्यावर आम्ही त्यात आणखी भर टाकू. राज्यातील जनतेने आणि लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे की पुन्हा महायुतीचे सरकार आणणार. राज्यातील बाकीचे पक्ष तळे तर आम्ही समुद्र आहोत. सर्वात जास्त सदस्य असलेला जगातील भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष कुठे आहे. ते राज्यपूर्ती मर्यादित आहेत. त्यांना केंद्रातून कोणाला बोलवायचं झालं तर ते कुणाला बोलवतील? काँग्रेसच्या प्रियांका गांधी, राहुल गांधी यांना बोलावतील? ठाकरेंचा केंद्रातून कोण येणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, “संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही ते उद्या एकनाथ शिंदे यांनाही दहशतवादी म्हणतील. त्यांच्यांवर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. सकाळी रोज वायफळ बडबड करण्याची त्यांची सवय आहे. पक्ष फोडण्याची संस्कृती महाराष्ट्रात शरद पवारांनी यांनी आणली. शरद पवार त्याचे जनक आहेत. एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रीपदाच्या लेव्हलचे उमेदवार आहेत. त्यांनी माझ्या जामनेरमध्ये दोन चार दिवस थांबून प्रचार करावा. पक्षाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. तेच राज्यात सहकार आणू शकतील. महायुतीच्या सर्वात जास्त जागा उत्तर महाराष्ट्रातून येतील आणि राज्यात सरकार देखील महायुतीचे येईल,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss