Friday, April 19, 2024

Latest Posts

गिरीश महाजनांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीमध्ये कोण कोण राजकारणी दिसले एक बॅनरखाली; चर्चाना उधाण

राजकारणात कधी कोण कोणासोबत फोटोमध्ये दिसेल सांगता येत नाही. त्याच बरोबर कोण कोणाच्या गोटात कधी जातील आणि बंडखोर होतील हे हि सांगता येत नाही.

राजकारणात कधी कोण कोणासोबत फोटोमध्ये दिसेल सांगता येत नाही. त्याच बरोबर कोण कोणाच्या गोटात कधी जातील आणि बंडखोर होतील हे हि सांगता येत नाही. त्यामुळे राजकारणात चालू असलेल्या घडामोडींवर आणि खऱ्या बैठकीच्या मागील राजकारणात अशी वेगवेगळे राजकारण खेळले जात असते त्यामुळे राजकारणात कोणाचा पत्ता कधी कट होईल आणि कधी कोण सत्तेवर बसेल हे सांगता येत नाही. आता एकमेकांचे शत्रू असलेली राजकारणी झटक्यात त्यांच्या मैत्री देखील होऊ शकते. असाच काहीसं घडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत चक्क राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फोटो छापण्यात आला आहे.त्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे ४० आमदारांना घेऊन भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली. नंतर पवारांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राजीनामा मागे घेतला आणि सर्व चर्चाना पूर्णविराम मिळाला. पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीवरील फुटीचं मळभ दूर झाल्याची चर्चाही रंगलेल्या आपण ऐकलं. मात्र, ही चर्चा असतानाच आता एका जाहिरातीमुळे दुसऱ्या नव्या चर्चेने जोर धरला आहे. भाजप नेत्याच्या वाढदिवसाच्या या जाहिरातीत चक्क अजित पवार आणि शरद पवार यांचा फोटो छापण्यात आला आहे. आता या नवीन फोटोमुळे राजकारणात पुन्हा नवीन समीकरण तयार होणार की काय? असेही म्हंटले जात आहे. आणि त्यामुळे राजकारणात नवीनराजकीय चर्चांना उधाण आलं आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने एका दैनिकात महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी जाहिरात छापण्यात आली आहे. ही जाहिरात पानभर आहे. या जाहिरातीत अजित पवार यांचा फोटो छापण्यात आला आहे. सोबत शरद पवार यांचाही फोटो आहे. विशेष म्हणजे या फोटोत भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांचाही फोटो झळकले आहेत. 

गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि सुरेशदादा जैन यांचेही फोटो आहेत. त्याचबरोबर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो छापण्यात आला आहे. पण या सर्वांच्या फोटोमध्ये अजितदादा पवार यांचा फोटो सर्वात मोठा छापण्यात आला आहे. त्यामुळे अंतर्गत राजकीय हालचाली सुरु आहेत अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अजितदादांचा मोठा फोटो छापण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एवढेच नव्हे तर अजितदादांच्या फोटोखाली जिवाभावाचा माणूस असं कॅप्शन देण्यात आलं आहे. तसेच शरद पवार आणि नरेंद्र मोदी पवार – मोदींच्या फोटो खाली अजित पवार, फडणवीस आणि महाजन यांचा तिघांचा एकत्रित फोटोही छापण्यात आला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ही जाहिरात देण्यात आली आहे. त्यावर या बँकेचे चेअरमन संजय पवार यांचाही फोटो आहे. तसेच आमदार मंगेश चव्हाण यांचाही फोटो आहे. मात्र, भाजप नेत्याच्या वाढदिवसाच्या फोटोत अजितदादा आणि शरद पवार यांचे फोटो छापण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्क लढवले जात आहे.

हे ही वाचा : 

मोठी बातमी!, Nitin Gadkari यांना पुन्हा आली जीवे मारण्याची धमकी

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss