शिवसेना गटाच्या एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले,” कसला ऑपरेशन टायगर, आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल. तसेच दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहासुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये बावनकुळेपासून सगळे तुम्हाला कलानगरमध्ये दिसतील, आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने सूड बुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही, असे संजय राऊत म्हणाले.
कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत. त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली. अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला. मी त्यांना सुचवलं ऑनलाईनमधून चर्चा करू पण मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ते जॉईन होऊ शकले नाही. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवर आम्ही पक्षात चर्चा करतो. आमच्या पक्षात लोकशाही आहे ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला.
विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते. राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे, त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये. लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना १८ हजाराचा मताधिक्य होतं. राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते मग ते स्वतःला मताधिक्य का नाही मिळू शकले, असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला.