महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नागपूरच्या मिहान परिसरात ‘पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क’ ९ मार्चपासून कार्यरत होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी मदत होणार आहे. या प्रकल्पात ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पाची पायाभरणी ही सप्टेंबर २०१६ मध्ये करण्यात आली.
मिहानमध्ये फूड प्रोसेसिंग युनिट व्यतिरिक्त, एक पिठाची गिरणी देखील स्थापित करण्यात आली आहे. त्यामध्ये दररोज १०० टन गव्हावर प्रक्रिया केली जात असून त्याच्या पिठाचा पुरवठा जालन्यासह आंध्र आणि तेलंगणा राज्यातील पतंजलीच्या बिस्किट युनिट्सना केला जातो. पतंजली पिठाच्या गिरणीसाठी थेट शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करते. जेव्हा मागणी जास्त असते तेव्हा व्यापारी किंवा एफसीआयशी संपर्क साधला जातो. पहिल्या टप्प्यात, लिंबूवर्गीय फळे आणि टेट्रा पॅकचे व्यावसायिक उत्पादन संयंत्र येथे सुरू केले जाईल. त्यामध्ये आतापर्यंत 1000 टन हंगामी फळांवर प्रक्रिया करण्यात आली आहे. संत्र्यावर प्रक्रिया करण्याचे कामही सुरू झाले आहे. याशिवाय उष्णकटिबंधीय फळांसाठी लागणारी सर्व यंत्रेही बसविण्यात येत आहेत.
दलालांना बाजूला केलं
फळे आणि भाजीपाल्याची शेतल शेतकऱ्यांकडून खरेदी करून पतंजलीने मध्यस्त म्हणजे दलालांना यातून बाजूला केलं. त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होत आहे.
शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण
यासोबतच बैकवर्ड इंटिग्रेशन अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी मदतही दिली जात आहे. पतंजलीच्या भारुव ॲग्री सायन्स या कंपनीने शोधलेल्या ‘धरती का डॉक्टर मशीन’च्या मदतीने शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण केलं जात आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात कोणत्या घटकांची कमतरता आहे आणि कोणत्या उत्पादनाचा फायदा होऊ शकतो हे सांगितले जाते.
1000 कोटी रुपयांची उलाढाल
याशिवाय, पतंजलीद्वारे उत्पादित रासायनिक विरहित सेंद्रिय खते आणि नमुने नर्सरी शेतकऱ्यांना पुरविली जाते. वेळोवेळी त्याच्या शेताची पाहणी करण्यासोबतच, शेतकऱ्याचे पीक एकदा तयार झाल्यावर त्याला त्याचा दाम मिळेल याची हमी पतंजलीकडून देण्यात येत आहे. नागपूर प्लांटमधून सुमारे 1000 कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे.
1500 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार
या प्लांटमध्ये आतापर्यंत सुमारे 700 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या संपूर्ण कामाच्या आराखड्यात सुमारे 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. या प्लांटच्या स्थापनेमुळे येथे पायाभूत सुविधांचाही विकास होणार आहे.
हे ही वाचा:
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची निराशा; २१०० रुपयांसाठी अजून वाट पाहवी लागणार