Thursday, November 30, 2023

Latest Posts

शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे – नितीन गडकरी

शास्त्रज्ञांनी संशोधन केले, पण जर ते तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसेल तर त्याचा काय उपयोग, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.

शास्त्रज्ञांनी संशोधन केले, पण जर ते तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसेल तर त्याचा काय उपयोग, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. आशिया खंडात लिंबूवर्गीय फळांसंदर्भातील संशोधन, तंत्रज्ञान या विषयावर चर्चा आणि ज्ञानाच्या आदान-प्रदानासाठी नागपुरातील हॉटेल सेंटर पाईंटमध्ये तीन दिवसांची परिषद आजपासून सुरू झाली. इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चरतर्फे ‘एशियन सिट्रस काँग्रेस-२०२३’चे आयोजन करण्यात आले.

या परिषदेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.गडकरी म्हणाले, इच्छा आहे तर मार्ग आहे. आणि इच्छा नसेल तर सर्वे, संमेलन, परिषद, समिती, उपसमिती, संशोधन गट या सारख्या बाबीमध्ये ते अडकून पडते.

मी शास्त्रज्ञांचा आदर करतो. त्यांच्यावरी टीका म्हणून नाही परंतु परिश्रमपूर्वक केलेले संशोधन तगळागळातील शेतकऱ्यांना सहायक ठरत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे. ते सरकारच्या आलमारीची शोभा वाढवेल. त्यामुळे यावर काही तरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याबाबत शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे, असेही गडकरी म्हणाले .

हे ही वाचा : 

आता ‘iPhone’ ही होणार ‘मेड इन इंडिया’ (Made in India)

संजय राऊतांनी फडणवीसांनी डिवचलं, मी पुन्हा येईल चं आम्ही सध्या स्वागत करतो कारण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss