spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

पालकमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव

राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार गुरुवारी ३० जानेवारी बीडमध्ये येणार आहेत. बीडच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बीडमध्ये येणार आहेत.

बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच चिघळले आहे. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप होत आहे. खंडणी ते खून प्रकरण या संपूर्ण घटनाक्रमात धनंजय मुंडेंचे सूत्रधार असून यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासावर भाजप आमदार सुरेश धस यांनी आरोप प्रत्यारोप केल्यानंतर तपासाला वेग आलाय. या सगळ्या घटना घडत असताना पालक मंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर अजित पवार बीडमध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर ते काय बोलतात, या बैठकीत नेमके काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राजाचे लक्ष आहे.

राज्यात एकीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राजकारणाला वेग आला असतानाच अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा यासाठी राजकीय दबाव वाढत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार गुरुवारी ३० जानेवारी बीडमध्ये येणार आहेत. बीडच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बीडमध्ये येणार आहेत.

येत्या ३० जानेवारीला बीडचे पालक मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक देखील पार पडली. दरम्यान १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. या संदर्भात राज्यात बैठकांचा सपाटा सुरु असून राज्य अर्थमंत्री अजित पवार यांचा बीड दौरा महत्वाचा समजला जात आहे. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार गुरुवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी बीड शहरात ठीक ठिकाणी बॅनर बाजी करण्यात आलीय. दरम्यान अजित पवारांच्या दौऱ्या बरोबरच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा देखील दौरा आहे आणि त्यांचे देखील स्वागताचे बॅनर झळकत आहेत.

हे ही वाचा : 

सुरेश धस यांना शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय ते बीडमधल्या दहशतवादा विरोधात तांडव करणार नाहीत Sanjay Raut यांचा दावा

ई पंचनामा प्रकल्पाचे प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करावी CM Devendra Fadnavis यांचे निर्देश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss