spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

त्यांनी रडीचा डाव खेळून अजित पवारांवर पराजयाचं खापर फोडलं, Rohit Pawar यांचा रोख कोणाकडे?

Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. महाविकास आघाडीच्या अनेक बलाढ्य नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अश्यातच निवडणुकीच्या निकालानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची भेट झाली. यावेळी अजितदादांनी रोहित पवारांना मिश्किल टोला लगावला तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पाया पडल्याचे दिसून आले. त्यानंतर रोहित पवार यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेले राम शिंदे यांनी अजित पवार आणि रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र उगारले. त्यावर आता रोहित पवार यांनी भाष्य केले आहे.

राम शिंदे नैराश्यामध्ये आहेत, खूप जास्त पैसा वापरुन सुद्धा प्रत्येक घरी जाऊन सुद्धा त्यांचा पराजय झाला आहे. ते गुप्त कॉन्ट्रॅक्ट म्हणत असतील तर मी अजित पवार, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांच्यासोबत केलेलं आहे. राम शिंदे, भाजप कार्यकर्तेच माझ्या मतदात संघात प्रचाराला आले नाहीत, ते बोलत आहे ते हास्यास्पद आहे. २०१९ ला सुद्धा ते अशाचं पद्धतीने बोलेले होते आणि खापर तेव्हा त्यांनी विखे पाटील यांच्या डोक्यावर फोडलं होतं. आता त्यांचा प्लॅन आहे रडीचा डाव खेळायचा. अजित पवारांवर खापर फोडायचं आणि मग कुठून तरी मंत्रीपद मिळतय का बघायचं, असा हल्लाबोल रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर केला.

ते काहीही लेव्हलला जाऊन बोलतायत, मी बारामतीत गेलो असतो तर तुतारीला मत दिलं असतं. मी माझ्या मतदारसंघात होतो त्या दिवशी. तिथे गुंडशाही सुरु केली नसती तर मी बारामतीला गेलो असतो. अजित पवारांनी माझ्या मतदारसंघात सभा का घेतली नाही हे मला सांगता येणार नाही, ते बारामतीत गुंतले होते. हार-जीत होत असते, त्यांनी त्यांचा पराजय स्वीकारावा, त्यांनी खापर न फोडता लोकशाहीला ताकद दिली पाहीजे. जिथे आमचे उमेदवार पडले आहेत, त्याविषयी चर्चा केली जाणार आहे. सगळ्या ईव्हीएम मशीन गुजरातच्या आहेत, त्यामुळे नागरिक निकालावर शंका घेत आहेत.

हे ही वाचा:

Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांचं काय झालं?

विधानसभा निवडणुकीनंतर Laxman Hake यांचे मोठं वक्तव्य; म्हणाले,” त्याला मंत्री करण्यापेक्षा मला गृहखातं…”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss