Saturday, June 3, 2023

Latest Posts

पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येणारं…..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिंदे रत्नागिरीत आहेत. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिंदे रत्नागिरीत आहेत. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक केला. आणि यावेळी एकनाथ शिंदे यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर बोलताना पुन्हा युतीचं सरकार येईल, असा ठाम विश्वास आहे असे देखील या भाषणातून स्पष्टपणे सांगितलं. यासोबतच ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमावरही त्यांनी भाष्य केलंय. २०१९ ला मोदींची लाट ज्या प्रमाणे पसरली होती अगदी तशीच लाट २०२४ च्या निवडणुकीच्या दरम्यान पसरेल असे मत त्यांनाही यावेळी मांडले. आता पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीतही नरेंद्र मोदी रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडणून येणार आणि पुन्हा युतीचं सरकार सत्तेत येणार, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.

एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी येथे घेतलेल्या सभेतून लोकांसाठी आमचे सरकार कसे फायदेशीर आहे. तसेच आम्ही तरुण वर्गाला कशी प्रकारे आम्ही रोजगार उप्लब्धते करून देणार आहोत याविषयी देखील त्यानि माहिती दिली. तर एकनाथ शिंदे यांनी ७५ हजार नागिराकंना रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे. तर केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं की मल्टीनॅशनल कंपनीत लोकांना रोजगार देता येईल.त्या परीने आमच्या सरकारने पावले उचलावी आहेत अशी घोषणा देकील यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून आपल्याला फंड देखील उपलब्ध होत आहे तसेच मुंबई गोवा महामार्ग कशा प्रकारे सोयीसुविधा करण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः लक्ष घातलं आहे असे देखील नमूद केले आहे. मुंबई- सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड रस्ता लवकरच बनवणार आहोत, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. शासन आपल्या दारी या अभियानातून सगळ्यांना लाभ होणार आहे. याठिकाणी आलेले सगळे लाभार्थी आहेत. शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. चांगलं शासन असं त्यांच ध्येय होतं. तोच आदर्श समोर ठेवून राज्य सरकार काम करत आहे. आधीची अडीच वर्ष सोडली तर आता आम्ही कॅबिनेटमध्ये सर्वसामान्य नागिकांसाठी निर्णय घेतले आहेत. सर्वमान्य लोकांच्याआयुष्यात बदल झाला पाहिजे, हाच अजेंडा आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

अडीच वर्षात आपण कारभार पाहिला आहे. सरकार कुठे होतं, हे आपण पाहिलं आम्ही लोकांच्या दारात जातोय.सरकारी काम आणि 6 महिने थांब हे चित्र आम्हाला बदलायचं आहे, असा मानस शिंदेंनी बोलून दाखवलाय.अनेक लोक माझ्याकडे येतात. जी काम जिल्हा पातळींवर होऊ शकता. आता ती कामं स्थानिक पातळीलाच होतील. लोकांच्या मनात शासनाबद्दलचं मत बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणून असे कार्यक्रम घेत आहेत. पूर्वीचं अडीच वर्ष सरकार सोडलं तर 35 कॅबिनेट बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले. आमचा अजेंडा सर्वसामान्यच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजेत, हाच आहे. गेल्या अडीच वर्षाचा कारभार आपण पाहिला. आता मात्र या सगळ्यात बदल होतोय, असंही ते म्हणालेत.शासन आणि प्रशासन रथाची दोन चाक आहेत. ती समान वेगाने धावली पाहिजेत. सगळे स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले आहेत. आता स्पीड पकडायला हरकत नाही. ऑनलाईन नाही, फेसबुक नाही तर डायरेक्ट फिल्डवर जाऊन आम्ही लोकांची कामं करतोय, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

हे ही वाचा:

राज्याच्या राजकारणात पुन्हा रंगणार काका- पुतण्यांची जोडी

गांधींनी केलेलं चालतं, मग मोदींबद्दलची पोटदुखी का ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss