spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

कॉलेजमध्ये असताना गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणाऱ्या तरुणाचा राजकीय वर्तुळात दबदबा कसा वाढला ?

बीडच्या राजकारणात वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचा उजवा हात अशी यांची ओळख निर्माण झाली होती. धनंजय मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून इतर गोष्टींचे नियोजन ते धनंजय मुंडे हे बीडमध्ये नसताना सर्व गोष्टी हाताळणाऱ्या वाल्मिक कराड यांना बीडचा प्रति पालकमंत्रीही म्हटले जायचे.

बीडच्या राजकारणात वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचा उजवा हात अशी यांची ओळख निर्माण झाली होती. धनंजय मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून इतर गोष्टींचे नियोजन ते धनंजय मुंडे हे बीडमध्ये नसताना सर्व गोष्टी हाताळणाऱ्या वाल्मिक कराड यांना बीडचा प्रति पालकमंत्रीही म्हटले जायचे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड यांनी अखेर मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. या हत्या प्रकरणांनंतर वाल्मिक कराड जवळपास २२ दिवस फरार होते. यापैकी काही दिवस वाल्मिक कराड हे पुण्यात होते. तरीही पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला वाल्मिक कराड यांचा ठावठिकाणा लागला नाही. संतोष देशमुख हत्येनंतर फरार झाल्यानंतरही वाल्मिक कराड यांना पोलिसांचे सरंक्षण होते अशीही चर्चा होती. यावरून वाल्मिक कराड यांना बीडच्या राजकारणात पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नाही असे बोलले जाते.

वाल्मिक कराड यांच्या आवाजातील जरब, रांगड्या स्टाईल मध्ये काम करण्याची पद्धत यामुळे त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांची गर्दी असते. महाविद्यालयात शिक्षण घेताना वाल्मिक कराड हे शर्टच्या मागच्या बाजूला गोपीनाथ मुंडे यांचे फेटेधारी छायाचित्र लावून फिरायचे. महाविद्यालयातील निवडणूका, त्यानंतर गोळीबारात जखमी होणे, अशा घटनांमुळे वाल्मिक कराड सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरले.

परळीत नगरपालिकेत त्यांनी नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष, गटनेता अशी अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. प्रत्येक टप्प्यावर हातातील यंत्रणेचा पुरेपूर वापर करत वाल्मिक कराड यांनी स्वतः भोवती गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कार्यकर्त्यांचे एक जाळे तयार केले. त्यामुळे वाल्मिक कराड यांची बीडच्या राजकारणात आपल्या पद्धतीने हवे ते करून घेणारा नेता म्हणून ओळख निर्माण झाली. यामुळे स्थानिक राजकारणात त्यांचा दबदबा वाढला.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss