Monday, November 13, 2023

Latest Posts

शपथा कसल्या घेता? संजय राऊतांचा सवाल

महाराष्ट्राची बदनामी केली जाते आहे. महाराष्ट्राच्या छाताडावर बेकायदेशीर सरकार बसून या मराठ्याची बदनामी केली जात आहे त्यामुळे आमच्या मनामध्ये आग पेटलेली आहे जळफळाट होत असल्याचे राऊत यांनी म्हटले.

दसऱ्याच्या निमित्ताने झालेल्या दशहरा मेळाव्यात अनेकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांचे भाषण भाजपला मजबूत करण्यासाठी होते. भाजपच्या संपर्कात आल्याने खोट्या शपथांचे प्रमाण वाढले आहे. शपथा कसल्या घेता, बाळासाहेबांशी गद्दारी करता..महाराजांच्या महाराष्ट्रात पाठीत खंजीर खुपसता आणि शपत काय घेता असा सवाल राऊत यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतःचा आचार विचार नाही. जे भाजप सांगत आहे ते करत आहे. काही दिवसांनी हे डोक्यावरती काळी टोपी घालून फिरतील. रक्ताचा शेवटचा थेंब आणि श्वास असेपर्यंत ते शिवसेनेत राहणार होते ते आता शिवसेनेत राहिले का असा सवाल त्यांनी केला.

भारतीय जनता पक्ष आमचा छळ करते त्यामुळे जाहीर सभेत राजीनामा देणारे हे आज भाजपच्या मांडीवर जाऊन बसणारे हे आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.महाराष्ट्रात शिंदे-भाजप सरकार आल्यानंतर हत्याकांड झाले नाही का, असा प्रश्न राऊत यांनी केला. पालघरचे हत्याकांड म्हणजे उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठीचा कट होता, असा दावाही त्यांनी केला. अशा प्रकारचं घडलेलं अपघाताचे प्रकरण वाढवण्यात आलं. त्यानंतर अनेक साधूंवरहल्ले झाले. हत्याकांड झाले, त्यावर तुमची का दातखिळी बसली असेही राऊत यांनी म्हटले.

शिंदे गटाकडून ठाकरे गटाचा मेळावा नसून शिमगा मेळावा असल्याची टीका केली होती. त्यावर राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. शिमगा हा महाराष्ट्रातील सण आहे. उत्सवाचा मोठा भाग आहे. शिमगा हा हिंदू सण नाही का? असा उलट प्रश्न राऊत यांनी केला. तुम्हाला नको आहे का? होळी, दिवाळी नवीन सण संघ परिवाराने आणले आहेत आणि ते तुम्ही महाराष्ट्रात सुरू करणार आहेत का असेही राऊत म्हटले. महाराष्ट्राची बदनामी केली जाते आहे. महाराष्ट्राच्या छाताडावर बेकायदेशीर सरकार बसून या मराठ्याची बदनामी केली जात आहे त्यामुळे आमच्या मनामध्ये आग पेटलेली आहे जळफळाट होत असल्याचे राऊत यांनी म्हटले.

हे ही वाचा: 

आमदार अपात्रतेच्या सुनावणीची तारीख ठरली

आमदार अपात्रतेच्या सुनावणीची तारीख ठरली

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss