महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी २३ नोव्हेंबरला जाहीर झाला असून महायुतीने महाविकास आघाडीच्या विरोधात दणदणीत यश मिळवलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा ‘लाडकी बहीण योजना’ महायुतीच्या यशाचा केंद्रबिंदू ठरली. निवडणुकीत राज्यातील मतदारांनी महायुतीला अग्रेसर ठेवलं. राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये रिंगणात २५० हून अधिक महिला उमेदवारांपैकी एकूण महिला २१ महिला या आमदार झाल्या आहेत. यात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही पक्षांचा समावेश आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हीतून प्रत्येकी ३० महिला उमेदवार विधानसभेत होत्या. यात भाजपकडून ११ महिला आमदार झाल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने १३२ जागा जिंकल्या आहेत.
- भाजप – १८
- शिवसेना (एकनाथ शिंदे) – ८
- अजित पवार (राष्ट्रवादी) – ४
- शरद पवार (राष्ट्रवादी) – ११
- शिवसेना (उद्धव ठाकरे) – १०
- काँग्रेस – ९
भाजपच्या विजयी महिला आमदारांची यादी
- चिखली – श्वेता विद्याधर महाले
- भोकर – श्रीजया अशोकराव चव्हाण
- जिंतूर – बोर्डीकर मेघना दीपक साकोरे
- वसई- स्नेहा पंडित
- कल्याण पूर्व – सुलभा गणपत गायकवाड
- बेलापूर – मंद म्हात्रे
- दहिसर – चौधरी मनीषा अशोक
- पर्वती – माधुरी सतीश मिसाळ
- शेगाव – मोनिका राजीव राजळे
- केज – नमिता अक्षय मुदंडा
- फुलंब्री – अनुराधा अतुल चव्हाण
शिंदे गटाकडून विजयी महिला आमदार कोण?
- मंजुळा गावित (साक्री)
- संजना जाधव (कन्नड)
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) गटाची यादी
- सुलभा खोडे (अमरावती)
- सरोज अहिरे (देवळाली)
- सना मलिक (अणुशक्तीनगर)
- आदिती तटकरे (श्रीवर्धन)
ठाकरे गट (उद्धव ठाकरे)
- ऋतुजा लटके (अंधेरी पूर्व)
- प्रविणा मोरजकर (कुर्ला मतदारसंघातून)
काँग्रेस
- ज्योती गायकवाड (धावरी मतदारसंघ)
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांकडून एकूण ४५ महिला उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी २४ महिला आमदार झाल्या होत्या. २८८ विधानसभा मतदारसंघापैकी २४ महिलांना आमदार होण्याची संधी मिळाली होती. यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत महिला आमदारांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाली असून २१ महिला आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
हे ही वाचा:
Vanchit नक्की कोणाला पाठिंबा देणार? Mahayuti की Mahavikas Aghadi? | Prakash Ambedkar | VBA | MVA