spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

Devendra Fadnavis यांना किती पगार मिळणार? राज्याच्या मुख्यमंत्र्याचा पगार असतो तरी किती?

देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर आज संध्याकाळी ५ :३० वाजता शपथविधी सोहळा होईल. देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून कालपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर काल देवेंद्र फडणवीसांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. याचदरम्यान एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती वेतन मिळतं?, देवेंद्र फडणवीसांना प्रति महिना किती पगार मिळणार?, याची सध्या चर्चा सुरु झाली आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन वेळोवेळी सुधारित केले जाते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन आता ३.४ लाख रुपये प्रति महिना झाले आहे. यापूर्वी २०१६ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन दरमहा २.२५ लाख रुपये होते. मुख्यमंत्र्यांना घर, गाडी, वीज, फोन, प्रवास अशा सुविधा मिळतात. त्यांना सर्वाधिक सुरक्षा मिळते. तथापि, या सुविधा राज्यानुसार बदलतात.

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे सर्वाधिक वेतन-

राज्य विधिमंडळाने मुख्यमंत्र्यांसाठी पगारासह अनेक भत्ते निश्चित केले आहेत. यामध्ये महागाई तसेच इतर अनेक भत्त्यांचा समावेश आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांना निवास, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा आदी मोफत मिळतात. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा ४.१० लाख रुपये दिले जातात. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ३.९० लाख रुपये, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना ३.६५ लाख रुपये, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना ३ .३५ लाख रुपये, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना ३.२१ लाख रुपये, हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना ३. १० लाख रुपये देण्यात आले आहेत.

हरियाणा-बिहारसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन –

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना २.८८ लाख रुपये, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना २.५५ लाख रुपये, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना २.३० लाख रुपये, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना २.२० लाख रुपये, २. १५ रुपये देण्यात आले आहेत. बिहारच्या मुख्यमंत्र्यांना लाख, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा २.१० लाख रुपये. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना २.०५ लाख रुपये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना २ लाख रुपये, सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांना १.९ लाख रुपये आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांना १.६ लाख रुपये वेतन दिले जाते. मुख्यमंत्र्यांच्या पगाराचा केंद्र सरकार किंवा संसदेशी काहीही संबंध नाही

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल २०२४

महायुती- २३७
मविआ– ४९
अपक्ष/इतर – ०२
———————
एकूण – २८८

महाराष्ट्र कोणत्या पक्षाला किती जागा.

भाजपा– १३२ जागा
शिवसेना (शिंदे गट)– ५७ जागा
राष्ट्रवादी (अजित पवार गट)– ४१ जागा
काँग्रेस– १६ जागा
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- १० जागा
शिवसेना (ठाकरे गट)– २० जागा
समाजवादी पार्टी– २ जागा
जन सुराज्य शक्ती– २ जागा
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- १ जागा
राष्ट्रीय समाज पक्ष– रासप- १ जागा
एमआयएम- १ जागा
सीपीआय (एम)- १ जागा
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया– पीडब्ल्यूपीआय- १ जागा
राजर्षी शाहू विकास आघाडी– १ जागा
अपक्ष- १ जागा
एकूण = २८८

भाजपाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष
जनसुराज्य शक्ती – २
युवा स्वाभिमान – १
रासप– १
अपक्ष –
भाजपचं एकूण संख्याबळ १३२+५ = १३७

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss