Wednesday, April 24, 2024

Latest Posts

कोणाला किती जागा मिळणार? यावर नाना पटोलेंनी मांडली काँग्रेसची भूमिका

आगामी लोकसभा निवडणूक आता एक वर्षावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे देशभरात सगळ्याच पक्षांमध्ये आता लगबग सुरु झाली आहे. देशभरातल्या बहुतांश पक्षांनी यासाठी तयारी सुरू केली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक आता एक वर्षावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे देशभरात सगळ्याच पक्षांमध्ये आता लगबग सुरु झाली आहे. देशभरातल्या बहुतांश पक्षांनी यासाठी तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी यासाठीच्या बैठका सुरू केल्या आहेत. महाविकास आघाडीतले शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या एकत्रित बैठका होत असताना दुसऱ्या बाजूला हे तिन्ही पक्ष स्वतंत्र बैठकादेखील घेत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कोर कमिटीची आज २३ मे रोजी बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. या बैठकीनंतर या तिन्ही नेत्यांनी काँग्रेसची आगामी निवडणुकांसाठीची भूमिका मांडली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले, निवडणुकांच्या दृष्टीकोनातून काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची पहिली बैठक पार पडली. येत्या दोन तीन तारखेला आम्ही राज्यातल्या सगळ्या जागांवर चर्चा करण्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, नेते, आजी-माजी खासदार-आमदार, प्रमुख नेते या सगळ्यांना मुंबईत बोलावून प्रत्येक जागेवर चर्चा करू. त्या माध्यमातून तीन पक्षांची जी समिती तयारी झाली आहे. त्या समितीला सामोरे जाऊ. नाना पटोले म्हणाले, आमची भूमिका स्पष्ट आहे. महाराष्ट्रात भाजपाला परास्त करणं आणि निवडणुकीच्या जागांवर मेरिटच्या आधारवर निर्णय होणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्या जागांवर चर्चा होईल. महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत चर्चा होईल अशी अपेक्षा आहे.

यावेळी नाना पटोले यांना विचारण्यात आलं की, कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या जातील. यावर नाना पटोले म्हणाले, जास्त जागा कोणाला मिळतील हे महत्वाचं नाही पण कोणता पक्ष कोणती जागा जिंकेल ते जास्त महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कोणाला किती जागा द्यायच्या यावर अद्याप चर्चा झालेली नाही. जो जिंकून येऊ शकेल त्या पद्धतीने तयारी करण्याची काँग्रेसने भूमिका घेतली आहे. मेरिटच्या आधारावर चर्चा केली जाणार आहे. पटोले म्हणाले, भाजपाला पराभूत करणं आणि महाराष्ट्राची अस्मिता वाचवणं हा काँग्रेसचा मुख्य उद्देश आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष या भूमिकेशी सहमत असतील. मी पुन्हा एकदा सांगतो, कोणाला किती जागा मिळतील ते महत्त्वाचं नाही.

हे ही वाचा:

सिडनीतून आपल्या सरकारबद्दल काय म्हणाले नरेंद्र मोदी …

राज्यात दंगलीस चिथवणी देणाऱ्या आशिष शेलारांवर गुन्हा दाखल करुन अटक करा, अतुल लोंढे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss