बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेला. राज्याचे आणि राजकारणाचे वातावरण चांगलेच तापले आहे. 9 डिसेंबरला हि निर्घृण हत्या झाली होती. या हत्याला २ महिने उलटले असून अद्याप १ आरोपी फरार आहे. या प्रकरणात ८ आरोपींना अटक करण्यात आली असून मकोका कायदा लावण्यात आला आहे. आरोपी वाल्मिक कराड याला संतोष देशमुख हत्येचा गुन्ह्यात नाही तर आवदा कंपनीच्या खंडणीच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने विरोधक धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा मागत आहे. आरोपींना अद्यापही शिक्षा मिळाली नाही आहे. आता या हत्याप्रकरणात महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या नियुक्तीवर काही राजकीय टीकात्मक प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. आता, निकम यांनी या नियुक्तीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कुटुंबियांनी या संदर्भात केलेल्या अनेक मागण्यापैकी ही एक मुख्य मागणी मान्य झाल्याने देशमुखांच्या कुटुंबियांनी आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं असले तरी इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्यत्याग आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे ग्रामस्थ, स्थानिक आमदार सुरेस धस यांनी सतत माझ्या नावाची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मला विचारणा केली. मा, काल मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्यागाच्या आंदोलनाला बसणं मला योग्य वाटलं नाही. म्हणून, मी काल मुख्यमंत्र्यांना कळवलं मी खटला चालवायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली.
राजकीय टीकेची मला गंमत वाटते
उज्ज्वल निकम यांची मस्साजोग हत्याप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्यानंतर प्रथमच त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी, राजकारण आणि वकील या दोन्ही वेगळ्या बाबी असून राजकीय टीकेची मला गंमत वाटते, एका निवडणुकीत मी लढलो आणि राजकीय परिपक्वता नसलेले लोक माझ्यावर टीका करत आहेत. गावकऱ्यांना मी आवाहन करतोय तुम्ही काळजी करू नका, मी आहे असेही उज्ज्वल निकम यांनी म्हटलं.
पोपटगिरी करणाऱ्यांनी मी भीक..
न्यायासाठी मी लढणारा आहे, हे महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या जनतेला माहीत आहे. पोपटगिरी करणाऱ्या लोकांना पोपटगिरी करू द्या, त्यांना मी भीक घालत नाही. देशमुख कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन करू नये. राजकीय लोकांच्या चिथावणीकडे लक्ष देऊ नका, असे आवाहनही निकम यांनी देशमुख कुटुंबीयांना केले आहे.
हे ही वाचा:
Rashmika Mandanna: साऊथ अभिनेत्री रश्मीका मंदानाकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी, ५ महागड्या गाड्या
Amol Kolhe: स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट का गुंडाळण्यात आला? अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा