spot_img
Sunday, January 12, 2025

Latest Posts

मी कालिदास कोळंबकर शपथ घेतो की…; कोण आहेत कालिदास कोळंबकर

काल ५ डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतली आहे. आता विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास नीलकंठ कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली. कालिदास कोळंबकर यांना आज राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या निलम गोऱ्हे उपस्थितीत होत्या. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन काळात कोळंबकर अध्यक्षतेखाली विधानसभेचं कामकाज होणार आहे. मी कालिदास कोळंबकर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी शपथ घेतो की… असे म्हणत कालिदास कोळंबकर यांनी राजभवनात विधानमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून आज शपथ घेतली.

येत्या 7, 8 आणि 9 डिसेंबर रोजी तीन दिवस मुंबईत विशेष अधिवेशन होणार आहे. या विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येते. ही शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड करणं गरजेचे असते. त्यानुसार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली आहे.

कोण आहेत कालिदास कोळंबकर –

कालिदास कोळंबकर हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. सर्वाधिक आमदारकीचा कार्यकाळ त्यांनी अनुभवला आहे. ते नव्यांदा आमदार झाले आहेत. सर्वाधिक अनुभवी आमदार असल्याने त्यांना विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं. १९९० पासून त्यांनी सलग विधानसभा निवडणूक जिंकल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’च्या घोषणेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नव्हे तर मतदारसंघातील अल्पसंख्यांक उमेदवार पाठीशी राहील, असा विश्वास व्यक्त केला होता. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपा या तीन पक्षांकडून विधानसभेची निवडणूक लढवण्याची आणि प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवण्याच्या पराक्रमाची कालिदास कोळंबकर यांच्या नावावर नोंद आहे.

कालिदास कोळंबकर हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान भाजपा खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. यांच्या राजीय कारकिर्दीची सुरवात शिवसेनेतून झाली. १९९० ते २००४ या काळात त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि जिंकून आले. त्या नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००९ ते २०१४ मध्ये मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघ येथून विधानसभेवर निवडणूक लढवली आणि निवडून आले. कोळंबकर यांनी पहिल्या निवडणुकीत त्यांनी त्यावेळेसचे गृह राज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास सावंत यांचा पराभव केला होता. नंतर ते भारतीय जनता पक्षात सामील झाले आणि 2019 मध्ये वडाळा येथून विधानसभेवर पुन्हा निवडून आले. यंदाच्या वडाळा विधानसभा निवडणुकीत भाजपा नेते कोळंबकर यांनी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) उमेदवार आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा पराभव केला. नवव्यांदा कालिदास कोळंबकर हे मुंबई शहरात मध्यवर्ती मतदारसंघ असलेल्या वडाळा विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss