२००२ मध्ये घडलेली अशी घटना ज्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. तो म्हणजे गोधरा प्रकरण. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच त्यावेळीच्या परिस्थितीबद्दल स्पष्टपणे सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १० जानेवारी रोजी पहिला पॉडकास्ट प्रसारित करण्यात आला. हा पॉडकास्ट जिरोधाचे को- फाउंडर निखिल कामथ यांनी यांच्या यूट्यूब चॅनलसाठी मोदी यांनी पॉडकास्ट केला.
२००२ मध्ये गुजरातमध्ये फेब्रुवारी मध्ये झालेल्या गोधरा कांडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उघडपणे भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी सांगितली, मी आमदार होऊन तीन दिवस झाले होते आणि गोधराची घटना गडली. ट्रेनला आग लागल्याची माहिती मिळाली. दुर्घटनेची बातमी मिळताच मी तिथे जाण्याचा निर्णय घेतला. मी गोधरा दुर्घटनेचं सत्य माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. या दुर्घटनेचे फोटो अत्यंत वेदनादायक होते, असंही मोदींनी या पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे.
काहीही झालं तरी मी तिथे जाणार
सुमारे दोन दशकांपूर्वी गडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता. पंतप्रधान मोदी यांनी पुढे सांगितलं की, पाच ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळी परिस्थिती कशी असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता. मी माझ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगितलं की, मला पोलिस नियंत्रण कक्षात जायचं आहे. यावर, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुरक्षेचे कारण देत तिथे जाण्यास नकार दिला. मी म्हणालो, काहीही झालं तरी मी तिथे जाणार. सुरक्षा कर्मचाऱ्यांना काय होईल, याची भीती वाटत होती, तरीही मी म्हणालो, मी जाईन. सुरक्षा कर्मचारी खूप काळजीत होते, पण मी गाडीत बसलो आणि म्हणालो की, मी आधी हॉस्पिटलमध्ये जाईन”.
जे काही होईल, त्याला मी जबाबदार
मी सभागृहात होतो. बाहेर येताच मी म्हणालो की, मला गोधराला जायचं आहे. तिथे फक्त एकच हेलिकॉप्टर होते. मला वाटतं ते ओएनजीसीचं होतं. पण त्यांनी सांगितलं की, ते सिंगल इंजिन हेलिकॉप्टर असल्याने ते कोणत्याही व्हीआयपीला त्यात प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाहीत. आम्ही वाद घातला आणि मी म्हणालो की, जे काही होईल, त्याला मी जबाबदार असेन. मी ते तुम्हाला लेखी स्वरूपात देईन.