Tuesday, November 28, 2023

Latest Posts

मी वेळ आल्यावर स्पष्ट करेन – मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा

ईडीच्या रडारवर असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरून मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

ईडीच्या रडारवर असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरून मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जयंत पाटील एका घटनेमुळे बचावले, नाहीतर आमच्याबरोबर शपथ घेतली असती, याबाबत लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहेत .

ते म्हणाले की, जयंत पाटील एका गोष्टीमुळे आमच्यासोबत ते आले नाहीत, अन्यथा त्यांनी आमच्या सोबतच शपथ घेतली असती. ती गोष्ट नेमकी काय आहे ते मी वेळ आल्यावर स्पष्ट करणार आहेत.

 

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांचे निष्ठांवत म्हणून ओळख राहिलेल्या मुश्रीफ ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर अजित पवार गटात सामील झाले आहेत. पीएम मोदी यांनी नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. मात्र, या टिकेला हसन मुश्रीफ यांनी मौन बाळगले. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळालं पाहिजे अशी भावना पहिल्यापासून आमची आहे, आणि आजही आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत, परंतु ते टिकलं पाहिजे ही भावना आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर मार्ग निघून मराठा आरक्षण देण्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्न करत आहे आणि यावर लवकरच तोडगा निघणार आहे.

मराठा आरक्षणाबाबत मी भावना व्यक्त केल्यानंतर मराठा समन्वयक समाधानी झाले आहेत. शासन पातळीवर हा तिढा सोडवावा लागेल , मराठा आरक्षणाचं चक्रव्यूह आपल्याला भेदावं लागेल. मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे त्यांनी आंदोलन कशा प्रकारे करावं हा त्यांचा प्रश्न आहे, त्यामध्ये राजकारण सुद्धा असण्याची शक्यता आहे. परंतु, आरक्षण देणं महत्त्वाच आहे.

हे ही वाचा : 

‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद

संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss