मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी व आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी करत परभणीत मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चातील सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी धनजंय मुंडेंनवर थेट निशाणा साधला आहे. आरोपींवर धनजंय मुंडेंचा वरदहस्त असून त्यांचे गुंड आता देशमुख कुटुंबीयांना धमकी देत आहेत. यापुढे अशा धमक्या दिल्यास धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे यांनी यावेळी दिला होता. त्यानंतर, मनोज जरांगे यांच्याविरुद्ध काही ठिकाणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, वाशिममध्ये काही धनंजय मुंडे समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. यासंदर्भात बोलताना जरांगे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला आहे.
धनंजय मुंडे आणि त्यांनी ज्या टोळ्या पाळल्या आहेत, लोकांच्या पोरांची हत्या करण्यासाठी, खंडण्या वसूल करण्यासाठी, गुंडागर्दी करायला. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा ही तत्परता का दाखवली नाही. ही तत्परता संतोष देशमुख यांचा खून झाला तेव्हा दाखवणं गरजेचे होतं. दोन दिवस त्या बिचार्याचा मृतदेह पडून होता, केजच्या हॉस्पिटलमध्ये आणि पूर्ण मसाजोग गाव रस्त्यावर बसून होतं. त्यावेळेस ही तत्परता दाखवायाला हवी होती, असे मनोज जरांगे यांनी म्हटलं. आता चक्क त्यांचे गुंड लोक संतोष देशमुख यांच्या भावाला सुद्धा दादागिरी करायला लागले, धमकी द्यायला लागलेत , संतोष देशमुख यांच्या मंडळींनी आणि लेकरांनी कसं जगायचं? धनंजय देशमुख न्यायासाठी फिरतोय आणि आज त्याला जर धमक्या यायला लागल्या तर एवढा मोठा समाज असून माय बापाच्या भूमिकेनं समाज येणार नाही का त्याला पाठिंबा द्यायला? असे अनेक प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केले आहेत.
मी गरिबांसाठी लढणार, मागे हटणार नाही,ह्यात मराठ्यांचा काय संबंध? तुम्ही सराईतपणे लोक मारत आहेत, वाईटाला वाईट देखील बोलायचे नाही का? ही कोणती पद्धत? तुम्ही तुमच्या सोयीनुसार मराठा,वंजारी,ओबीसी करता आणि वेळ गेली की फक्त तुमचेच, ही कुठली पद्धत आहे. खून होऊन आम्ही बोलायचं नाही मग तर अवघड झालं, यासारखे अनेक मुद्दे मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल करत उपस्तिथ केले आहेत.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?