सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी गेल्या काही दिवसांपासून परळीसह बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मालिका समोर आणताना अनेक धक्कादायक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियात पोस्ट केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी केली आहे. परळी म्हणजे बिहारचा बाप झाल्याची परिस्थिती आता सध्या तिथे असून खूप गंभीर म्हणजे लोक जे आम्हाला पुरावे देतात व्हिडिओ देतात फोटो देत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. प्रत्येकाचे हेच म्हणणं असून दहशत खूप मोठी आहे, फक्त आमचं नाव देऊ नका माहिती आम्ही सगळे द्यायला तयार असल्याचे लोक म्हणत असल्याचेही त्या म्हणाल्या.
नेमकं काय म्हणले
अंजली दमानिया म्हणाल्या की, परळीत मोठ्या प्रमाणावर दहशत आहे. एकट्या परळीत 109 मृतदेह मिळत असतील तर या जिल्ह्याची स्थिती काय असेल? अशी विचारणा त्यांनी केली. फक्त यामध्ये तिघांची चौकशी व्यवस्थित होताना दिसते बाकीच्या प्रकरणात म्हणजे 106 प्रकरणात चौकशी सुद्धा नीट होत नसल्याचा आरोप दमानिया यांनी केला. त्यांनी सांगितले की, माझं म्हणणं आहे की इकडे पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर तेथील आमदारांचा आणि वाल्मीक कराड यांचा कंट्रोल आहे. हा कंट्रोल यंत्रणेवरचा निघाला पाहिजे, म्हणूनच मी परत परत त्याच म्हणते की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणं गरजेचं असल्याचे दमानिया म्हणाल्या.
45 कलम लागणारी वक्ती लाडकी बहिणची अध्यक्ष
दमानिया यांनी सांगितले की, वाल्मीक कराडवर 22 गंभीर आणि इतर 23 कलमे अनेकवेळा लागले आहेत. असे 45 कलम लागलेल्या व्यक्तीला जर मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा अध्यक्ष बनवलं गेलं, तर याच्याहून धक्कादायक दुसरी बातमी होऊ शकत नाही. त्याची शिफारस सुद्धा धनंजय मुंडे यांनी केली हे जेव्हा कळतं तेव्हा अतिशय धक्कादायक असल्याचे त्या म्हणाल्या. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड दोन वेगळे व्यक्ती नाहीत एकच व्यक्ती असल्यासारखे काम करतात. वाल्मीक कराडची पूर्ण चौकशी योग्य रीतीने होण्यासाठी धनंजय मुंडे हे बाहेर गेले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
हे ही वाचा:
रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने शिवानी-अंबरचं केलं केळवण; कलाकारांनी शेयर केले फोटो