मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांना निकटचा सहकारी आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनाम्यासाठी मागील ३ महिन्यांपासून जोर धरला जात होता. त्यातच धनंजय मुंडेंची पहिली पत्नी करूणा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट द्वारे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो काल समोर आले. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, “इतक्या गोष्टी समोर येऊन सुद्धा आज तुम्ही चित्र पाहिले असतील संतोष देशमुख यांना तिथे क्रूरपणे मारण्यात आलं. मृत्यूनंतर त्यांच्या तोंडामध्ये जो प्रकार केला लघवी करण्याचा, किती परा कोटीचा क्रौर्य या महाराष्ट्रात बीडमध्ये जिथे धनंजय मुंडे पालकमंत्री आहेत आणि हे सर्व लोक धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित आहेत. धनंजय मुंडे हे काही महात्मा नाहीत हे मिस्टर फडणवीस यांना देखील माहिती आहे. अजय पवार यांना देखील माहिती आहे
त्यांच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर कशाप्रकारे मतदारांना धमक्या दहशत या माध्यमातून मतदार करू दिले नाही हे निवडणूक आयोग आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलं आहे आणि अमित शहा यांनी देखील पाहिलं, त्यांची निवडणूक त्याच वेळा रद्द व्हायला पाहिजे होती. तसं झालं असतं तर कदाचित संतोष देशमुख यांचे प्राण वाचले असते.”
पुढे ते म्हणाले, “आज पोलिसांनी जे पुरावे जे व्हिडिओ जे फोटो समोर आणले ते सर्व चित्र महाराष्ट्रात किती क्रूर झालेले आहे. एका बाजूला तुम्ही छावा चित्रपटात औरंगजेब किती क्रूर आहे ते दाखवता, औरंगजेब संभाजी महाराजांच्या बाबतीत किती क्रूर आणि आणि त्यांचा मृत्यू दाखवला त्यांच्या हुतात्मेआम्ही पाहिलं. तितकाच क्रूरपणा संतोष देशमुखांच्या बाबतीत संभाजी राजांच्या राज्यामध्ये प्रजेचा एक जनता नागरिक क्रूरपणे संतोष देशमुख चा मृत्यू झाला आणि त्याचा मृत्यूचा हत्येचा खेळ राजकारणांनी केला,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
“देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. त्यांनी २४ तासात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. ते म्हणतात कोर्ट ठरवेल, आता प्रथमदर्शनी पुरावे दिसत आहेत, नैतिकतेच्या मुद्द्यावर हा राजीनामा त्यांनी घेतला असता तर देवेंद्र फडणवीस यांनी न्याय केला असं आम्हाला छाती ठोकपणे सांगता आले असते. देवेंद्र फडणवीस यांना जर न्याय करायचा असेल तर कलंकित मंत्र्यांना त्यांनी मंत्र्यांना ताबडतोब बाहेरचा रस्ता दाखवायला हवा जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा आणि कायद्याचा गैरवापर कोणी करू नये या राज्यात राजकीय दृष्ट्या हे सुद्धा पाहिला हवं, असे संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा:
Skin Care: पिंपल्सच्या समस्येपासून सुटकारा; गुलाब पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.