spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना लाथ मारुन हाकललं असतं; नितीन देशमुख संतापले

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हेच या हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळं या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी देखील मागणी करण्यात येत आहे. धनंजय मुंडे यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या शिबिरात वाल्मिक कराड याच्यासोबत आर्थिक हितसंबंध असल्याचा दावा फेटाळून लावला होता. या सर्व बातम्या खोट्या असल्याचे मुंडे यांनी म्हटले होते. आता, आज नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडे यांना घरातूनच नव्हे तर जिल्ह्यातून लाथ मारुन हाकलून लावलं असतं, असं वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलं आहे. अकोल्यातल्या जन आक्रोश मोर्चात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे देखील सहभागी झाले होते. यावेळी बोलताना देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली.

धनंजय मुंडे मंत्रीपदावर राहिले तर त्याचा फायदा वाल्मिक कराडला होईल. त्यामुळं मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी, मागणीही देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा मित्र आणि धनंजय मुंडे यांचे मित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भवऱ्यात आहे. महाभारतातील कर्णाप्रमाणानेच धनंजय मुंडे त्याच्या मित्राला साथ देतील, अशी शंका देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

धनंजय मुंडे यांच्यामुळे तो मोठा झाला-प्रकाश सोळंके
प्रकाश सोळंके यांनी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्यामुळेच मोठा झाल्याचे म्हटले. धनंजय मुंडे यांच्याकडे सातत्याने बीडचे पालकमंत्रिपद असल्यानेच जिल्ह्याची वाट लागली. वाल्मिकला कोणी पोसले? तो कोणाचा माणूस आहे? धनंजय मुंडे यांच्यामुळे तो मोठा झाला, असे प्रकाश सोळंके यांनी म्हटले

हे ही वाचा : 

सरकार स्थापनेवेळी एकनाथ शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता Sanjay Raut यांचा भाजपला टोला

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला नाराजी नाट्यामुळे स्थगिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss