spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

मी दोषी वाटलो तर ते राजीनामा घेतील, धनंजय मुंडे यांनी दिल्लीत केलं स्पष्ट

मंत्री धनंजय मुंडे आज दिली दौऱ्यावर आहेत. धनंजय मुंडे यांनी आज केंद्रीय नागरी व अन्न पुरवठा मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर देखील भाष्य केले आहे.

 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे याच्याबाबतही धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला असता यावर मला हा प्रश्न विचारून काय होणार. माझी भूमिका गेले 51 दिवस स्पष्ट आहे. संतोष देशमुखांची हत्या ज्यांनी केली, त्यांना फाशी झाली पाहिजे, असं धनंजय मुंडे म्हणाले. मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याबाबत विचारले असता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणाले, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. त्यांना मी दोषी वाटलो तर ते राजीनामा घेतील, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्राच्या सर्व समस्या सुटल्या पाहिजेत- धनंजय मुंडे
धनंजय मुंडे दिल्लीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आजपासून तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याबाबत दिल्लीत निर्णय होणार, अशी चर्चा रंगली होती. यावर देखील धनंजय मुंडेंनी भाष्य केलं. मी दिल्लीला निघताना मला कळालं की, देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत येत आहेत. मी दिल्लीत आल्यावर मला कळाल. एकविसाव्या शतकात काही लपून राहत नाही, असं धनंजय मुंडेंनी सांगितले. मी पहिल्यांदाच अन्न नागरी पूरवठा मंत्री म्हणून जबाबदारी घेतली. त्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्यांची भेट झाली. लोकसंख्या वाढली आहे. 8-9 महत्वाचे विषय होते. त्यावर चर्चा करून मार्ग काढणे आवश्यक होतं. ⁠याआधीसुद्धा विभाग पाठपुरावा करत होता. महाराष्ट्राच्या सर्व समस्या सुटल्या पाहिजेत. केंद्रीय मंत्र्यांनी चांगला प्रतिसाद दिला, अशी माहिती धनंज मुंडेंनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले होते?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तथ्य आणि पुराव्यानिशी अजून कुणाचं नाव आल्यास त्यावरही कठोरात कठोर कारवाई केली जाईल. मात्र कुणाचा काही संबंधच नसताना कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. किंबहुना कुणाचा संबंध असल्यास त्याला अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. हीच भूमिका माझ्यासह राज्याच्या मुख्यमंत्र्यांची असल्याची प्रतिक्रिया देत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

हे ही वाचा : 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss