spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

“मी चुकीचं काम केलं असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा”; Ravindra Dhangekar यांचे विधान

पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ज्या काँग्रेसने त्यांना आमदारकी आणि खासदारकीचं तिकीट दिलं त्यांनतर आता महापालिका निवडणूका तोंडावर असताना पक्षाला रामराम केल्याने पक्षाला मोठा फटका बसला आहे.

पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ज्या काँग्रेसने त्यांना आमदारकी आणि खासदारकीचं तिकीट दिलं त्यांनतर आता महापालिका निवडणूका तोंडावर असताना पक्षाला रामराम केल्याने पक्षाला मोठा फटका बसला आहे. सोबतच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भीतीपोटी पक्ष सोडल्याचा दावा करत भाजपवर टीका केली आहे. या सर्व आरोपांवर स्वतः धंगेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“संजय राऊत हे आमचे नेते आहेत, खासदार आहेत, माझ्या परिवारातले आहेत, ते काहीही बोलले तर वडीलकीच्या नात्याने मी ऐकून घेईल. मी त्यांच्याबरोबर खूप वर्ष काम केलंय. त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. १० शिवसेनेचा नगरसेवक म्हणून काम केलं. त्यांना चुकीचं वाटत असेल तर त्यांना बोलायचा अधिकार आहे आणि त्यांनी तो वापरला त्याबद्दल माझ्या मनात शंका ही नाही आणि रागही नाही. मी ती जागा विकत घेतली त्यात मी सहावा मालक आहे. मी ज्यांच्याकडून जागा विकत घेतली तिथे सरकारी कार्यालय आहे. सरकार त्या मालकाला भाडे देते आणि त्यांच्याकडूनच मी ही जागा विकत घेतली. सरकार जर त्या जागेला भाडे देत असेल तर हीच सरकारची चूक आहे की कोणाची तुम्ही तपासून घ्या. एक प्लॉट विकत घेतला म्हणजे ती पूर्ण जागाच वक्फ बोर्डची असं असेल तर उरलेली जागा पण वक्फ बोर्डची असायला हवी.”

मी अरविंद शिंदेंचे आभार मानतो. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्यांना समजवण्याचा मी प्रयत्न करेन. तीन निवडणुकींमध्ये त्यांनी माझ्याबरोबर काम केले. ते ती निवडणूक मध्ये शहराध्यक्ष होते. त्यामुळे त्यांनी प्रचंड काम केलं त्यामुळे मी एवढी मत घेऊ शकलो.माझी बांधिलकी जनतेशी, जिथं चूक दिसेल तिथं मला सांगा. मला बदनाम केलं किंवा नाही तरी माझी बुद्धी मला सांगते. मी चुकीचं की वाईट काम केलं नाही, असं धंगेकर यांनी म्हंटल आहे. भाजपमध्ये सगळेच वाईट आहेत असं नाही. राजकारणात एकमेकांच्या डोक्यावर पाय ठेवल्याशिवाय पुढे जात नाही. अजित पवार आणि भाजप एकत्र येतील असं वाटलं होतं का? असा सवालही रवींद्र धंगेकरांनी केला आहे.

हे ही वाचा : 

Uddhav Thackeray आणि Eknath Shinde आमने सामने येताच; कहीं पे निगाहें कहीं पे निशाना…

Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पाने बळीराजाला काय काय दिले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss