spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

मी माझ्या आयुष्यात कोणाचाही अनादर करणारं वक्तव्य केलं असेल तर…..Uday Samant यांचा हल्लाबोल

गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेणार असतील तर त्यात कटशहाच राजकारण नाही. त्यांना केवळ ठाण्यात नाही तर राज्यात कोणी शह देऊ शकत नाही.

रत्नागिरी येथे आज १५ फेब्रुवारी रोजी उद्योग मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील अनेक जण आमच्यासोबत येणार आहेत. माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि जिल्हाप्रमुख विलास चाळके देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढेल असं मला वाटत नसल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.

महायुती म्हणून निवडणूक लढवायची अशी एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो, हे कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी सांगावं लागत आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याची जबाबदारी असते, त्यामुळे त्यांना दोष देऊन उपयोग नाही. भास्कर जाधव विधिमंडळातील वरिष्ठ आहेत, अशा व्यक्तीचे मार्गदर्शन भविष्यात आम्हाला मिळणार असेल तर आम्ही स्वागत करू. भास्कर जाधव नाराज असतील तर ते स्वतः सांगतील. त्यांचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचे दुर्दैव आहे भास्कर जाधव यांचं नाही, असे वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना केले.

मी माझ्या आयुष्यात कोणाचाही अनादर करणारं वक्तव्य केलं असेल तर राजकीय संन्यास घेईन. मी देखील नवी मुंबईमध्ये जनता दरबार घेणार आहे. गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेणार असतील तर त्यात कटशहाच राजकारण नाही. त्यांना केवळ ठाण्यात नाही तर राज्यात कोणी शह देऊ शकत नाही. भाजपमधील नेत्याबद्दल मी वैयक्तिकरित्या बोलणे चांगलं नाही. पराभवानंतर अनेक नेत्यांनी आपलं काय चुकलं याचे आत्मचिंतन केले आहे. लोक का जात आहेत याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. प्रकृतीची चौकशी करण्यासाठी सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना भेटले आहेत. त्यावर आक्षेप कसा घ्यायचा, त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन आहे याची कल्पना असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हे ही वाचा:

‘धस हे कधीही पलटी मारतील, ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे’ Sanjay Raut यांचे टीकास्त्र

‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमदार Jitendra Awhad यांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss