spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

“कपड्याचा रंग निळा असला म्हणजे…” Narayan Rane यांचा राहुल गांधींना टोला

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज परभणी दौऱ्यावर आहेत. त्यांनी कोठडीत मुत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटूंबाची भेट घेतली. पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले आहेत. मी कुटुंबाला भेटलो, त्यांनी मला पोस्टमार्टम रिपोर्ट दाखवला, व्हिडीओ दाखवले. ९९ टक्के नाही तर १०० टक्के ही हत्याच आहे. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण केली. ते दलित असल्यामुळे त्यांना मारहाण झाली असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान राहुल गांधी हे जेव्हा सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले तेव्हा ते वाहानाच्या मोठ्या ताफ्यासह परभणीत दाखल झाले होते. त्यांनी अंगामध्ये निळा शर्ट घातला होता. यावरून आता भाजप खासदार नारायण राणे यांनी राहुल गांधी यांना जोरदार टोला लगावला आहे.

राहुल गांधींना महाराष्ट्र कळालेला नाहीये, राहुल गांधी यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरी कळलेत का? कपड्याचा रंग निळा असला म्हणजे तो आंबेडकरवादी होत नाही. कपड्यांच्या आत त्यासाठी काहीतरी लागतं, असा हल्लाबोल यावेळी नारायण राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ आम्हाला सीनियर होते, त्यामुळे आम्ही त्यांच्या गटामध्ये होतो. दिल्लीतली हवा चांगली आहे, म्हणून कदाचित भुजबळ यांना दिल्लीत बोलवलं असेल. भुजबळ साहेबांनी फडणवीस यांची भेट घेतली त्याबद्दल त्यांना शुभेच्छा असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नितेश राणे यांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली, यावर बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं की, नितेश राणे मंत्री झाले त्याचा मला फार आनंद आहे, दोन मुलं आमदार त्यापैकी एक मंत्री, आणि बाप खासदार देशात असं समीकरण कुठेच नाही, त्यामुळे मी फार खुश आणि समाधानी आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss