Friday, March 29, 2024

Latest Posts

आमदार निलंबित झाले असते तर…. अजित पवार

काल सत्तासंघर्षाचा निकाल लागला त्यांनतर सर्व विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नैतिकता पळून राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

काल सत्तासंघर्षाचा निकाल लागला त्यांनतर सर्व विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नैतिकता पळून राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नैतिकतेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजीनामा देतील असे स्वप्न पाहू नये अशी टीका अजित पवारांनी केली आहे. पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर बोलले आहेत. नाना पटोले यांनी राजीनामा दिला ही आमची चूक आमची चूक आहे असे त्यानं मान्य केले आहे. नाना पटोले यांनी जर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नास्ता तर १६ आमदार निलंबित झाले असते. अटलबिहारी वाजपेयी यांनी जे केले आहे त्यांची उंची आताचे भाजपचे नेते गाठू शकत नाही असे ते म्हणाले.

पुढे अजित पवार म्हणाले की, नैतिकतेच्या आधारे राजीनामा देण्याचा विचार ते स्वप्नातही करू शकत नाही. राजीनाम्याबाबतीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की जे मला त्यावेळेस जे योग्य वाटलं ते केलं. आला तर आताच्या अनुभवावरून निर्णय द्यावा असा सल्ला सुद्धा त्यांनी दिला आहे. सर्वाच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पक्षांतर बंदी कायद्याता कितपत अर्थ उरेल किंवा अर्थ राहिल की नाही याची भीती वाटते. राज्यामध्ये अशा घटना घडल्या की, राजकीय स्थिरतेवर परिणाम दिसून येतो. लोकांच्या जनमताचा अपमान होतो.

पुढे अजित पवार म्हणाले की, राज्यपाल म्हणाले की, मला त्यावेळी जे पटलं ते मी केलं. त्यावेळच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी कोणाला न सांगता राजीनामा दिला तो द्यायला नको होता. जेव्हा त्यांनी राजीनामा दिला तेव्हा आम्हाला कळले की राजीनामा दिला. त्यांनतर रिक्त झालेले हे पद महाविकास आघाडीकडून तातडीने भरलं गेलं नाही. ते भरलं गेलं असत तर १६ आमदार अपात्र ठरले असते. मी या बाबतीत कोणाला दोष देणार नाही पण महाविकास आघाडीकडून हे पद भरायला हवे होते असे अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा : 

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss