राज्यात जर केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नसे तर या राज्यामधल्या सामान्य घरातील लेकीबाळांची काय परिस्थिती असेल? नुसतं लाडकी बहीण, लाडकी बहीण करून लाडका भाऊ करून काय उपयोग? नुसते खुळखुळे वाजवून फार काळ तुम्हाला इथे राहता येणार नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाण साधला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचाच विनयभंग होतो आणि गृहमंत्री कोण तर देवेंद्र फडणवीस, असे म्हणत सरकारला टोला दिला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काल झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी एक विधान केलं. सरकारची नवी टर्म असली तरी आमची टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची अदलाबदल झालेली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. अजितदादांची मात्र फिक्स आहे. दादांचं बरं आहे, नो टेन्शन अशी टिप्पणी शिंदेनी केली होती. यावरून संजय राऊत यांनी शिंदेना टोला दिला आहे. त्या खूर्चीसाठीच शिंदे अमित शहांना भेटले होते. मात्र कायमस्वरुपी खूर्ची हवी असल्यास पक्षात विलीन व्हा असेही शहांनी सांगितले. रिफायनरी व्हावी यासाठी आमच्यातले माजी आमदारांना त्यांनी तिथे बोलावलं आहे. त्यासाठीच ते या आधी प्रयत्न करत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.
काल ठाण्यामध्ये आम्ही गेलो, आमच्या गाड्या तिथल्या गुंडानी अडवल्या. आम्हाला आनंद दिघे साहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून देण्यास विरोध केला. ज्या गुंडानी आम्हाला विरोध केला तशाच प्रकारच्या गुंडानी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला, असं म्हणत संजय राऊतांनी विरोधकांवर टोला लगावला.
हे ही वाचा:
लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.