मनोज जरांगे-पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. वेळ पुढे जात आहे, तशी त्यांची तब्येत खालावत चालली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी मनोज जरांगे-पाटील यांना आवाहन केले होते. त्यात मनोज जरांगे-पाटील यांनीसुद्धा चर्चेला येण्यासाठी सरकारला आवाहन केले आहे. पण अजूनही सरकारकडून चर्चेसाठी सकारात्मक हालचाली होत नसल्याने मनोज जरांगे यांनी माझं हृदय बंद पडलं तर सरकारचं हृदय बंद पडलंच म्हणून समजा, असे भाष्य केले आहे. मला जर काही झालं तर माझा मराठा सामंज आंदोलन करेल, मला काही होणार नाही. आंदोलन थांबणार नाही. माझ्या हृदयावर आणि किडनीवर परिणाम होईल, असे डॉक्टर म्हणत असले तरीही परिणाम होऊ द्यायचा नसेल तर सरकारने ताबडतोब आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले.
आता सरकारला येऊ द्या, त्यांना रस्ता देऊ. मला बोलता येतं तोपर्यंत या. माझे मराठे तुम्हाला आवडणार नाही. पण माझी बोलती बंद झाली आणि तुम्ही नाटक म्हणून आले तर मराठे तुम्हाला बेजार करतील. हे तितकंच खरं आहे. तुम्ही आज उद्या या. आज उद्या मला शंभर टक्के चांगलं बोलता येऊ शकतं हे माझं शरीर मला सांगतं. छत्रपतींच्या पायाला हात लावला की मला दोन-चार तास ऊर्जा मिळते, असंही मनोज जरांगे म्हणाले. एकाला तरी जीव धोक्यात घालावा घालणार आहे. तेव्हा सर्व समाजाचं कल्याण होणार आहे. आपल्याला दुःख व्हायला नको, आणि न्यायही पाहिजे असं होत नाही. त्यामुळे कोणाला तरी दुःख भोगावे लागणार आहे. हा दुसरा टप्पा आहे. तुमचं म्हणणं काय तर सरकार लक्ष देत नाही, थोडं थांबा, तुमच्या सर्व काही लक्षात येईल. शेवटी त्यांना आरक्षण द्यावंच लागणार आहे, असे म्हणत मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.
हे ही वाचा :
‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद
संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .