मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही, तुम्ही आताही चौकशी करू शकता. २०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्या विरुद्ध काम केलं. विनायक राऊत हेच माझ्या पराभवाला कारणीभूत असून, त्यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे. विनायक राऊत यांनी माझ्याविरोधात काम केलं असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी केला.
एकनाथ शिंदे यांनी आम्हाला तिघांना सुद्धा समजावून सांगितलं की, ही शिवसेना आपल्याला वाढवायची आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आहेत, अशा मोठ्या नेत्याबद्दल छोट्या कार्यकर्त्याने बोलणं उचित वाटत नाही. माझ्या मतदारसंघातील माणसांना न्याय द्यायचा असेल तर मला योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असं मी बोललो होतो, त्यामुळे आता मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. कोणत्याही चौकशीला आम्ही घाबरत नाही, तेव्हाही मी घाबरलो नाही, आताही मी घाबरत नाही. चौकशी केली तरी मी सहकार्य करेल आणि मला खात्री आहे मी निर्दोष असेल. जेव्हा निवडणूका असतात तेव्हा आरोप होत असतात, असे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राजन साळवी यांचा ठाकरे गटाला राम राम
ठाकरे गटाचे राजन साळवी हे देखील आज ठाण्यात शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. लांजा, राजापूर,साखरपा या भागातील त्यांचे हजारो कार्यकर्ते बुधवारी रात्री मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. आज हे सर्व कार्यकर्ते राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी हजार राहणार आहेत. मोठे शक्तिप्रदर्शन देखील केले जाणार आहे. राजन साळवी यांना शिवसेनेत योग्य तो सन्मान मिळेल अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी व्यक्त केली.
काय म्हणाले राजन साळवी ?
राजन साळवी यांच्या आज होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी किरण सामंत आणि राजन साळवी यांची बैठक पार पडली. रात्री तब्बल दोन तास बैठक सुरु होती. यानंतर राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या काळामध्ये त्यांच्या सोबत मी जाऊ शकलो नाही. परंतु, जाण्यासाठी निमित्त लागतं ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो. एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद घेतला. आजच्या या बैठकीमध्ये माझ्या जिल्ह्यातले पालकमंत्री उदय सामंत,आ. किरण सामंत आम्ही एकत्र बसलो आमच्या मतदारसंघातील जिल्हा संदर्भातील ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्या बाबत चर्चा झाल्या त्या ठिकाणी सर्व चर्चा सकारात्मक झाल्या आहेत. सामंत बंधू आणि मी सुद्धा समाधानी आहोत. आम्हा सर्वांना एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद आवश्यक आहे. भविष्याच्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात देऊन. संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल. एकत्र काम करून अभिवचन दिलेला आहे.उद्या सर्वांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होईल याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे, असे राजन साळवी यांनी सांगितले.
हे ही वाचा:
महादेव मुंडेंच्या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी पथकाची नेमून; SP नवनीत काँवत यांचा निर्णय
Kokan Hearted Girl Ankita walawalkar अडकणार विवाहबंधांत; सुरु झाली घरी लगीनघाई