spot_img
spot_img
Wednesday, October 4, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेना ठाकरेगटाला आणखी एक मोठा धक्का, ‘या’ माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश…

शिवसेना (Shiv Sena) पक्षात फूट पडल्यानंतर अनेक आमदार (MLAs), खासदार (MPs) आणि पदाधिकाऱ्यांनी (Office-bearers) शिंदे गटात (Shinde group) प्रवेश केला आहे.

शिवसेना (Shiv Sena) पक्षात फूट पडल्यानंतर अनेक आमदार (MLAs), खासदार (MPs) आणि पदाधिकाऱ्यांनी (Office-bearers) शिंदे गटात (Shinde group) प्रवेश केला आहे. ठाकरे गटाची (Thackeray group) ही गळती अद्याप सुरूच आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम काते (Former MLA Tukaram Kate) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला. एवढंच नव्हे तर माजी आमदार तुकाराम काते यांच्या पत्नी व बीएमसीच्या माजी नगरसेविका समृद्धी काते (Samriddhi Kate) यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. तुकाराम काते हे मुंबईतील (Mumbai) अणुशक्तीनगरचे माजी आमदार असून ते ठाकरे गटाचे विद्यमान शाखाप्रमुख होते. तर समृद्धी काते या उपशाखाप्रमुख होत्या.

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तुकाराम काते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि मुंबईच्या कायापालटात योगदान देण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला.” दुसरीकडे, शनिवारी मुंबईत महाराष्ट्र काँग्रेसलाही (Congress) मोठा धक्का बसला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (BMC) काँग्रेसच्या सात माजी नगरसेवकांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे यातील बहुतांश नगरसेवक हे काँग्रेसच्या आमदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Mumbai Congress chief Varsha Gaikwad) यांचा मतदारसंघ असलेल्या धारावीतील (Dharavi) आहेत.

मुंबईतील काँग्रेस नगरसेवकांनी (Councillors) एवढ्या मोठ्या संख्येने शिंदे सेनेत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईतील काँग्रेसच्या सात माजी बीएमसी नगरसेवकांनी शनिवारी पक्षाचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये सायन कोळीवाड्यातील नगरसेविका पुष्पा कोळी (Pushpa Koli), चांदिवलीतील वाहिद कुरेशी (Wahid Qureshi), ज्योत्स्ना परमा (Jyotsna Parmar), धारावीतील कुणाल भास्कर शेट्टी (Kunal Bhaskar Shetty), बब्बू खान (Babbu Khan), कुणाल माने (Kunal Mane) आणि त्यांच्या पत्नी गंगा माने (Ganga Mane) अशा नगरसेवकांचा समावेश आहे.

हे ही वाचा: 

‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल…

महाराष्ट्रातील जेजुरी खंडोबा मंदिर भाविकांसाठी दीड महिने बंद…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss