शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत जालना शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. पण यापूर्वी २५ जून आणि १८ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. तसेच या नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक देखील पार पडली होती. मात्र, पुढे हा दौरा रद्द झाला होता. मात्र आता “शासन आपल्या दारी”अभियानातंर्गत पात्र लाभार्थ्यांना थेट विविध शासकीय योजनांचा लाभ, महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्र देण्यात येतात. सध्या राज्यभर या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. या अभियानाचा भाग म्हणून जालना शहरातील नवीन मोंढा परिसरातील भागात ८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्यावतीने नियोजित भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
दोन वेळा मुहूर्त हुकल्यावर अखेर शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचा जालना दौरा ठरला आहे. “शासन आपल्या दारी”अभियानातंर्गत पात्र लाभार्थ्यांना थेट विविध शासकीय योजनांचा लाभ, महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्र देण्यात येत आहे. राज्यभरात हा उपक्रम राबवला जात असून, अनेक जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis),अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत भव्य कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. दरम्यान जालना शहरात 8 सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर याच नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पाडली आहे. कार्यक्रमस्थळी उपस्थित लाभार्थी, नागरिक यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. सर्व विभागप्रमुखांनी काटेकोर नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी करावा, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले.
दरम्यान आयोजित या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी पांचाळ म्हणाले की, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सर्व समितीप्रमुखांनी सोपवलेली जबाबदारी दक्षतेने पार पाडवी. कार्यक्रमस्थळी उपस्थित लाभार्थी, नागरिक यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या विविध योजनांच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी कार्यक्रमस्थळी स्टॉल लावावेत. कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, अग्निशामक वाहन, रुग्णवाहिका, आरोग्य विभागाची टीम सज्ज ठेवावी. कुठल्याही प्रकारे उपस्थितांची गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी करावा, असेही जिल्हाधिकारी यांनी सूचित केले. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर जिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी संगीता सानप, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विभागप्रमुख उपस्थित होते.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार या ठिकाणावरून परिस्थितीवर नियंत्रण
गोल्डन बॉय नीरज चोप्राचं बॉलिवूड सेलिब्रिटींनी केलं अभिनंदन…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.